आजचा दिवस

        

                  २६ जुलै २००५, तारीख तशी सहज लक्षात राहण्या सारखी पण हा दिवस होता, निसर्गाच्या भयनाट्याचा त्याच्या उदरात भरलेल्या रागाचा, आणि तेच घडले होते २६ जुलै रोजी रोजच्या वेळेप्रमाणे धावणारी मुंबई आणि उपनगरे ते थेट ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा.... पर्यंत, पण सकाळपासून रिमझिमत चालू झालेल्या पावसाने दिवस भर दमदार हजेरी लावली होती. एरव्ही मुंबईला पाठ दाखवून पाळणारा पाऊस त्यादिवशी मात्र मुंबईच्या जीवनाशी खेळ खेळत होता. काही म्हणू शकतो आपण दैवाची नाराजी किंवा निसर्गाचा कोप काहीही पण पावसाने जणू काही हातच न राखून ठेवता मनसोक्त खेळायचं हे ठरवलेले होते. पण त्याचा खालचा उन्मत्तपणा काही जास्तीचा वाढीव ठरला आणि तो मुंबईकरांच्या जीवाशी खेळून गेला. घरी निघालेले सर्व लोक अर्ध्यातच अडकून पडले. अर्ध्यादिक लोकांना तर घरी पोहोचता आलेच नाही. ते भिजणे शेवटचे भिजणे होते.
                  अनंत पसरलेला हा माणसाच्या विश्वाचा पसारा आणि कुटुंबाचा आधार असलेली त्याची ती नाती, त्यादिवशी तर खूप दूर गेली होती. चहूकडे पाण्याने भरलेले शहर आणि वास्तव्याला नसलेली जागा, कोलमडलेले जीवन, तुटत असलेला श्वास हे चित्र त्या दिवशीचे होते. सलग ३ दिवस पडणाऱ्या त्या पावसाला सोबत होती ती समुद्राची ज्याने आपल्या भयकार लाटांनी मुंबईचे बाहेरील विश्वच बंद केले. काही लोक वाहून गेली तर काहींची घरे वाहून गेली. आणि राहिले मागे ते फक्त अश्रू.
                 सर्व ठिकाणची छायाचित्रे पाहणे अतिशय कठीण झाले. पण जे पहिले गेले ते हृदयद्रावक होते. विकिपिडीयावर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे. ते नुकसान फार मोठ्ठेदेखील होते.आज मुंबई पुन्हा पूर्वपदावर असली तरी तिला जे काही भोगावे लागले ते अतिभयंकर होते.
                  आज हा लेख लिहिला, तो फ़क़्त त्या आठवणींना पुन्हा वाट करून देण्यासाठी, त्या पुरात मृत पावलेल्या त्या सर्व व्यक्तींसाठी आपली श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून, निसर्ग आपली बाजू प्रत्येक वेळी आपल्या समोर अशीच उभी करणार आणि आपल्याला दाखवणार कि तो किती शक्ती शाली आहे!

 काही वाचनीय लेखणी या विषयान्तर्गत (साभार आंतरजालावरून)
फोटोस, ब्लॉग,  स्पष्टीकरण,

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर