परत येशील का???

प्रिय कल्पि,

तुला हे पत्र लिहितेय खंर... पण तुला ते मिळेल का नाही माहित नाही...

कारण तू अचानक कुठेतरी दूर निघून गेलास... सगळे म्हणतात कि माझा भाऊ देवाघरी गेला... मला नाही खंर वाटत... आता तुच सांग सगळ्यांना कि तू इथेच आहेस म्हणून... पटकन या पोस्ट वर कमेंट कर आणि सगळ्यांना चकित कर...

तूच म्हणत होतास ना अजून एक गेट- टुगेदर करूयात.. कोकणात जाऊयात...
चल की.. तू म्हणशील तिथे जाऊ... खूप मजा येते तू सोबत असताना.. तू, भरत आणि गण्या.... आपल्या ग्रुप च हिट त्रिकुट...

मी तर तुला एकदाच भेटले प्रत्यक्ष.. नुकत्याच झालेल्या आपल्या सारसबाग भेटीत... पण बझ्झ अगदी नवीन होत तेव्हाची आपली ओळख.. रोज.. अगदी रोज.. आपली नेट भेट ठरलेली..

अगदी बॉसचा ओरडा खाल्ला इथपासून आज मी नवीन ड्रेस घातलाय इथपर्यंत सगळ काही मी बझ्झ वर टाकायची.. आणि कुणाचा रिप्लाय येवो न येवो.. तुझा नक्की यायचा...

आपण कसे एकत्र आलो आता आठवत नाही.. पण बझ्झ वरचा तू माझा पहिला मित्र होतास.. ग्रुप मधल्या इतर कोणाच्याही आधीपासून...

आपल्या ग्रुप मध्ये कोणाशीही कसलाही वाद वैगेरे न झालेला.. प्रत्येक वेळी पडती बाजू घेणारा.. कोणाचीही खोडी वैगेरे न काढणारा असा माझा सगळ्यात लाडका भाऊ... अगदी आपल्या ग्रुप मधल्या मुलींच्या बझ्झ वर काहीही वेडेवाकडे लिहिणार्याला चांगला इंगा दाखवण्यापासून ते बझ्झ वर झालेल्या एका वादातून मला सावरणारा तूच होतास...

आठवतंय तुला.. आपल बझ्झ मराठी मित्र मंडळ स्थापन झालं त्याचा पहिला अध्यक्ष तूच होतास.. आणि आपल्या मंडळांच चिन्ह म्हणून ती धारधार भवानी तलवार निवडणारा तूच...

आपल्या ग्रुप मध्ये सगळ्यांना एकत्र आणणारही तूच होतास आणि भेटूयात भेटूयात असं म्हणून पुढाकार घेणारही तूच... तुझ्यासोबत तुझ्या ब्लॉगलाही पोरकं करून गेलास...

आज पुन्हा पुन्हा आपल्या त्या भेटीचा वृतांत वाचते आहे.. घाई गडबडीत सुद्धा एकाचाही उल्लेख करण्यात तू चुकला नाहीस.. आणि आता पुन्हा आपली भेट होईल त्याच्या वृत्तांत सुद्धा..

गर्द कोवळ्या मनाची हा कुठे श्वास कोंडला!

काळोखाच्या उंबऱ्यात का जीव असा सोडला!!
धुंद विश्वात जगणे आतुर भेटी बहु पाहुणे!
काळोखी जणू मनुचीया हि सावज झाली मने!! धृ.!!

हृदयी प्रेमे, चेहरे अनामिक काळजात ठासले!
एकलाची जणू जीव जगी या जगण्यास फेकले!!
प्रश्नाच्या या जंजाळातून उत्तरे ना स्तवने!!१.!!
काळोखी जणू मनुचीया.....

तव धनुष्या टोकावरची धार पुनः बोथटली!
सप्त रंगांच्या आयुष्यात हि काळरात्र पसरली!!
मन हे आतुर, वेडे फिरुनी लक्ष जाळी हि हवने!!२.!!
काळोखी जणू मनुचीया.....

रात्र दिव्यांची, दिन अंधारी तुटते रे आतडे!
गर्दीत जणू चिरडले रे दुखी-व्याधीत कातडे!!
पाषाणाच्या प्रेमापोटी खंडित हृदय अन मने!!३.!!
काळोखी जणू मनुचीया.....

संसाराचा हा रे पसारा क्षणभंगुर न वाटे!
दुख एकीचे वाटुनी सगळे शंका मनी का दाटे!!
विश्वासाचा धागा तोडूनी नाती न जोडणे!!४.!!
काळोखी जणू मनुचीया.....

कास लक्ष्मीची, आर्त भुकेची पापांची माऊली!
ओसाड पडती मग पुण्ये हि फोडती रे टाहोळी!!
अश्रूंच्या त्या हिंदोळ्यावर आटती हि स्पंदने!!५.!!
काळोखी जणू मनुचीया.....
-


हि अशी कशी कविता?? इतकं कसलं दु:ख होत तुला??

इतकं टोकाला जाण्यापूर्वी आमच्यापैकी कोणाचीच आठवण नाही झाली का रे तुला?? एकदाही??

सगळ्यांची दु:ख आणि प्रॉब्लेम्स वाटून घेतलेस ना रे तू?? मग तुला काही खुपत होत तर आम्हाला का नाही बोललास? तुझ्या मनातल मळभ... आम्हाला त्यापासून दूर का ठेवलंस? आम्ही तच मध्ये नव्हतो तुझ्या पूर्णवेळ.. कबूल आहे.. पण तू एक फोन केला असतास तर आम्ही नसतो का रे बोललो तुझ्याशी? नसत ऐकून घेतल तुझं?? मी तुझ्याशी हल्ली बोलले नव्हते.. कारण परीक्षेच्या गडबडीत शक्यच नाही झालं रे... त्याची एवढी मोठी शिक्षा देणार का रे तू तुझ्या लहान बहिणीला..??

मी बहिण ना तुझी? मग तुझी बहिण आज तुला गळ घालतेय.. जिथे असशील तिथून परत ये.. आमचे कान धरायला... पुन्हा एकदा गेट टुगेदर करायचं ना?? मी कोकण एक्स्प्रेस ची तिकीट काढतेय... सगळ्यांची.. या वेळी नक्की सगळे येतील.. अगदी सगळे.. कोणीही टांग देणार नाही.. शप्पत... तू म्हणशील तिथे जाऊ.. तू म्हणशील तिथे राहू.. फक्त एकदाच ये रे... एकदाच...

मी वाट बघतेय तुझ्या येण्याची.. येशील ना??

8 comments:

विनम्र श्रद्धांजली कल्प्या ....!!!!
तू कायम स्मरणात राहशील....
 
Kalpya

.
.
.
.
.
.
.
.
.

hmmmmmm!
 
आजच कल्पेश बद्दल समजल....मन खुप सुन्न झालय...

भावपुर्ण श्रद्धांजली :( :(
 
कल्पेशला लिहिलेलं हे पत्र श्रद्धांजली विभागात टाकायला मन धजावत नव्हते.. आणि नाही... :'(
 
काल मला कल्पी बद्दल समजले, एक जोराचा मोठा धक्का होता आणि मला तो न-पचण्या जोगा क्षणार्धात सगळ सुन्न सगळे संपल्यासारखे वाटले. अजून देखील विस्वास नाही बसत काय हें खरे आहे का ?? का रे केलेस तु असे ? सगळेच माझ्यासाठी अनुउत्तरीत काही दिवसा पूर्वी माझ्यात आणि कल्पी मध्ये जो सवांद झाला तो असा होता....!!

11:20 AM
me: hi

gm

रणांगण: hi

kasa ahes
11:21 AM
me: mast majet tu re kasa ahes

ani barech divas zale

रणांगण: काम त्रास सगळ

me: call nahi ki sms nahi athavan yete ki nahi amachi

ho kam tar sagalyanach asatat ki
11:22 AM
रणांगण: अरे फोन गेला चोरीला नंबर नाहीत न कुणाचे तुझे दे

नंबर

me: ...........
mag navin phone ghetalas ki nahi
ajun
11:23 AM
रणांगण: सध्या आहे
11:25 AM
me: pan kasa harvala re mob
रणांगण: बस मध्ये
21 minutes
11:46 AM
me: hi bol
11:47 AM
net gele hote maze
aso baki kay mhantos

tuza job kasa chalu ahe
11:50 AM
रणांगण: चालू आहे रे नुसता
बाकी वैताग
11:55 AM
थांब आलो
कधी येतोयेस मग परत तु, मी वाट पाहतोय तुझी.. मग येणार ना ??? हा देखील प्रश्न माझ्यासाठी कायमचा अनुउतरीतच राहिला आता.
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर