5

अतः बुद्धम.............

                       शीर्षक वाचून चरित्र लेख असल्यागत वाटल हो ना........ मला वाटलेलंच पण काय आहे मला शीर्षक सुचलंच नाही. तर आता सांगतो लिहिण्याच कारण काय ते, परवा मी माझ्या एका मित्र सोबत असाच फिरत होतो. तेव्हा गप्पा मारता मारता त्याने विचारले कि, "भगवान गौतम बुद्ध हे माणूस होते. असा मी आज वाचल!" मी थोडा चकित झालो आणि त्याला विचारले कि, "हा प्रश्न का?" तर त्याने उत्साहाने सांगितले कि, "हा प्रश्न मी सकाळी एकाकडून एकल, आणि त्याच उत्तर तूच देऊ शकतो आता मला तू सांगच." माझ्या मनात आले "कि हा आज वेताळ झाला आहे कि काय आणि मी स्वतःला विक्रम समजू लागलो" मस्करी नको म्हणून मी त्याला हसत उत्तर दिल कि "हो, भगवान बुद्ध हे माणूसच होते, परमेश्वराने साक्षात मानवाला दर्शन कधीच दिलेले नाही आणि देणारही नाही. पण त्याने जशी आई बनवली तसेच त्याने माणुसकी दर्शविण्यासाठी काही थोर पुरुषांना जन्म दिला".
          थोडासा वेळ गेला आम्ही फिरून झालं. आणि मघाचा प्रश्न पुन्हा त्याने विचारला मग मी त्याला संपूर्ण माहिती सांगितली. भगवान बुद्ध म्हणजे राजा सिद्धार्थ याने आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. तर पुन्हा "का? म्हणून" प्रश्न केला. आता काय कराव खरोखर मी राजा विक्रम झालो होतो. "हम्म, मग समजावून सांगितलं ते एक मानवच होते. बुद्ध आर्य वंशज होते त्यांची आई राणी मायादेवी व वडील राजा शुद्धोधन हे होते.त्याचं खर नाव राजा सिद्धार्थ होत. पण लहानपणापासून राजघराण्यात राहिलेल्या सिद्धार्थला दुख: या गोष्टी पासून अलिप्त ठेवण्यात आले होते. पण वयात आल्यावर सिद्धार्थ स्वतः त्या गोष्टींच्या समोर जाऊ लागला होता. २९-३० वयापर्यंत त्यांनी दुख:, दारिद्र्य, दैन्य पाहिले पण नंतर त्यांनी याचे मूळ कारण काय? आपण इतके लोभी, क्रोधी, अहंकारी का होतो? मनुष्य अश्या पद्धतीने का जगतो? असे कित्तेक प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागले होते. त्यात त्यांनी पाहिले कि सगळ्यांचा जन्म आहे, सगळ्यांनाच म्हातारपण, आजारपण आहे आणि सगळ्यांनाच विधिलिखित मृत्यू आहे. पण हे का आहे. हे कसं आहे. हे शोधण्यासाठी त्यांनी आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. आणि रानात निघून गेले.त्यांनी तिथे खूप तप केले. जप केले पण त्यांच्या हाती या गोष्टींच मूळ काही लागेना आणि त्यांना विचार पडे कि कसे शोधावे त्याचे मूळ. त्यांनी कठोर तपस्या केली आणि त्यात ते मृत्युच्या जवळ जाऊन आले. पण अजूनही समाधान नव्हते. नंतर त्यांनी तपस्या सोडून अष्टांग मार्ग वापरले. ते आपण ओळखतो सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति, सम्यक समाधि. या नावांनी आणि आपण यांचा रोजच आपण उपयोग सुद्धा करतोच ना." मग माझ्या मित्राला ते समजल. कि ते मानव होते. पण त्यांनी या गोष्टींचा छडा लावण्यासाठी त्याग केला होता. त्याला पटले कि त्यांचा त्याग खरंच आजच्या माणसापेक्षा मोठा होता आणि खरा होता.
           असच राहून राहून पुन्हा मीच त्याला विचारले कि "काय रे तुला बुद्ध म्हणजे काय हे माहिती आहे का?" त्याने म्हटले कि "नाही". माझ्या मते जे काही आहे ते मी त्याला सांगितलं "बुद्ध म्हणजे बुद्धीच्या जोरावर ज्ञान मिळविलेला आहे तो, ज्ञान येणे अत्यंत महत्वाचे पण ज्ञान मिळविणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे, देव आपल्याला बुद्धी देतो पण तिचा उपयोग आणि त्याची उद्दिष्ट पार पडणे हे आपल्या हातात असते. म्हणून जो बुद्धीवर विजय मिळवतो तो बुद्ध. आणि सिद्धार्थाने ते मिळविले म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वार्थ भावाने उपयोग न करता  इतर जनतेसाठी उपयोग केला. त्या ज्ञानातून प्रत्येक व्यक्तीने खूप बोध घेऊन दुखा:ने भरलेले आपले जीवनविश्व कसे मार्गी लावावे हे शिकून घेतले. शिक्षण असले तरी त्याच्या परे काही शिकण्यास मिळाले तर आयुष्य सोप्पे होते. बुद्धांनी त्यांच्या वैवाहिक, व्यावहारिक आणि सामाजिक बांधिलकीच्या जीवनाला सोडून जीवनातील अष्ट दुखांच्या विरोधात उभे राहून आपल्या जीवनात आनंद कसं आणता येईल आणि जीवन अजून सुखकर कसे करता येयील हे त्यात दाखवून दिले. आपण मनुष्य आहोत मनुष्य मनात काही ठरवून ती गोष्ट पार पडू शकतो. जीवन व्यतीत करणे म्हणजे फ़क़्त जगणे नाही याचा अर्थ बुद्धांनी दिला, आणि हे सर्व सिद्धार्थांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मिळविले होते  म्हणूनच त्यांना बुद्ध म्हंटले जाते". बुद्धांची इतकी माहिती दिली तरीही माझ्या मित्राच मन काय भरलं नव्हत. आणि डोक्यावरून प्रश्न चिन्ह काही उतरत नव्हतं पुन्हा विचारले त्याने कि मग त्यांना भगवान का म्हणतात? आता माझ्यातला विक्रम खूप पेंगला होता इतक सांगून पुन्हा आणखीन काहीतरी नवीन. परत त्याने विचारले कि "भगवान तर देवाला बोलतात न मग बुद्ध हे देव नव्हते तर त्यांना का भगवान बोलतात." मी सांगितले कि, "लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नको, आता भगवान देवालाच म्हणतात असं कोण बोललं देवाला आपण काय म्हणून ओळखतो. देव आपल्याला सदैव देणारा, देणारा कधी पण मोठ्ठा असतो म्हणून त्याला भगवान म्हणतात. बुद्धांनी त्यांच्या ज्ञानाचा अपव्यय नाही केला.
आणि नाही स्वार्थभावाने स्वत: करिता राखून ठवले. तर सर्व जगात आपले अनुयायी पाठवून प्रसार केला आणि त्या माध्यमातून लोकांना सरळ मार्ग दाखवला. त्यांच्या अष्टांग मार्गाचा अवलंब करणारा व्यक्ती त्यांना ज्ञान रुपी देव मानू लागला. म्हणून त्यांना भगवान गौतम बुद्ध म्हणून संबोधले जाते."
         त्यांचं कार्य महान आहे माझी माहिती तर त्यांच्या कार्यासमोर खूप लहान आहे. मला जितक माहिती आणि माझ त्यांच्याविषयी जितक स्पष्ट मत आहे. त्याप्रमाणे सांगण्याचा हा तुला प्रयत्न बाकी सर्व सिक्लोच आहे शाळेत त्याच्या विचारांच्या अनुरूप जगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. बाकी त्यांच्या नावाने चाललेले वाद विवाद वैगेरे आपल्याला नाही ठावूक. आणि कुणाच्या धर्माला दुखावणे हा हेतू तर अजिबात नाही. भगवान बुद्धांच्या तीनही प्रतिमांना माझे त्रिवार अभिनंदन. माझे इथे काही चुकले असेल तर कृपया क्षमा असावी. त्यांच्याच प्रमाणे भगवान महावीर, भगवान महाबली यांचा सुद्धा खूप मोठ्ठा हातभार आहे. मानवी संस्कृती उभी करण्यामागे. दे सुद्धा मानवच होते. पण सर्व त्याग करून त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांप्रमाणे जगाला शांती आणि सुखाचा मार्ग दाखवला.







मूळ लेखन : कल्पेश मोहिते ( रणांगण) 

4

गजरा - २



माझी तीन नंबरची प्रेमा आत्या तिच्या किस्श्यांसाठी आम्हा सर्वात प्रसिद्ध. मनमुराद चुका करणे आणि त्या सगळ्यांना सांगता सांगता तेव्हढ्याच मनमोकळेपणाने हसणे हा तिच्या खेळकर स्वभावाचा एक पैलू.  तिनी कधी कुणा  लहान  मुलाला  धाक लावायचा प्रयत्न केल्याचं किंवा कुठल्या नातेवाईकात आवाज  चढवल्याचं स्मरणात नाही. सत्तरीजवळ आली असली तरी तिची निरागसता मात्र  ८  वर्षाच्या  मुलीसारखीच  टिकली  आहे.  

चंपाषष्ठी म्हणजे खंडोबाच्या नवरात्री घरी सगळेजण मिळून देवासाठी भरपूर हार करतात. त्यात विविध रंगसंगतीची अन सगळ्यात भारी हार बनवण्यात ही पटाईत, तर हिच्या हातची साटोरी  खायला  साक्षात  अन्नपूर्णा  रिझर्व्हेशन न करता लाल डब्ब्यातून येईल अशी  ही सुगरण.

उर्मिला मातोंडकरच लज्जा सिनेमा मधलं ’आईये आजाईये’ या गाण्यातला , ओ रा रा री री रा रा असा कोरस आहे ना, त्या कोरस ऐवजी आमची ही  आत्या ’उद्याला टीव्ही बघा’ असं  गायची. काहीतरी  काम  करता करता ती तंद्रीतच ’उद्याला टीव्ही बघा’ असे म्हणते आहे हे ऐकल्यावर आम्हा सगळ्या लोकांची तर 
हसून हसून मुरकुंडीच वळली.  अजूनही जर कधी हे गाणं माझ्या तोंडात बसलं तर मी ओ रा रा री री रा रा  कधीच गात नाही. किंबहुना कोरस मध्ये’उद्याला टीव्ही बघा’ हेच जास्त चपखल बसते असे माझे स्पष्ट मत  झाले  आहे. बघा तुम्हीही गाऊन बघा. :)


गेल्या आठवड्यात ती घरी आली होती तेव्हा सांगत होती,

"परवा शाळेत गेले होते.  शाळा  सोडल्याचा  दाखला आणायला.  पिऊनला सांगून तब्बल ५०  वर्षांपुर्वीचा दाखला काढून घेतला. त्याच्यानंतर घरी  परततच होते  तेव्हा  एक  मैत्रीण भेटली."

मैत्रीण म्हणाली, " अगं किती वर्षानी भेटत आहेस! इकडे कशी काय?"

त्यावर आत्याबाई तंद्रीतच  म्हणाल्या, " डेथ सर्टिफ़िकेट आणायला गेले होते."

मैत्रीणीने काळजीपुर्वक चेहरा करून विचारलं, "अस्सं? कोणाचं?"

आत्याबाईना अजूनही आपण स्कूल लिव्हिंग सर्टिफ़िकेट ऐवजी आपण  नक्की काय बोललो याची तंद्री नव्हती, ती म्हणाली, "माझंच की!"

मैत्रीण अजून सीरियस झाली आणि म्हणाली, "अगं काय बोलतीयेस! बरी आहेस ना? तुझं डेथ सर्टीफ़िकेट?"

तेव्हा कुठे तिला स्वत: केलेली गफ़लत लक्षात आली, आणि ’अगो बाई, काय बोलले मी!’ असा चेहरा करून  खळखळून हसू लागली. 

तिच्या खुमासदार शैलीत किस्सा ऐकवता ऐकवता तिच्या मनमुराद हास्यात मी सुद्धा कधी दाखल झालो समजलेच नाही . :) 



- पंत     
2

चिकन बिर्याणी आणि उपोषण


माझ्या जन्माच्या आधी घडलेली घटना आहे. माझ्या दादांनी सांगितलेली हि उपोषण कथा आहे. खरे तर रामदेव बाबांचे उपोषण चिरडले त्यावेळी हा किस्सा त्यांनी सांगितला होता. पण कामाच्या व्यस्ततेमुळे लिहावयास जमले नाही. म्हणून आज पोस्ट टाकते आहे. 

१९७० च्या आसपास उरणमधील एक पुढारी उपोषणास बसले, १,२,३, असे करत ४ था दिवस उजाडला नेहमी प्रमाणे डॉक्टर येऊन आले उपोषणकर्त्याचे ब्लडप्रेशर तसेच इतर चेकअप करण्यात आले सगळे नॉर्मल, एखाद्याला असते सवय म्हणून डॉक्टरांनी जास्त चर्चा न करता आपला रिपोर्ट वर पाठवला.

५ व्या दिवशी जिल्हाधिकारी पहाणी करण्यास आले असता त्यांनी कोणतीही चर्चा न करता, आश्वासन न देता सरळ त्यांच्या सगळ्या मागण्या तत्काळ मान्य केल्या. कारण जिल्हाधिकारी आले तेव्हा उपोषणकर्त्याची चौकशी करतानाच अचानक व्यासपीठाच्या खाली प्रचंड मोठे असे कुत्र्यांचे खेखाट झाले. ते बघण्यासाठी खाली वाकले असता चिकन च्या हाडांसाठी कुत्र्यांचे भांडण चालू होते त्यामुळे सगळे भांडे फुटले. 

प्रत्यक्षात उपोषणकर्त्यावर नजर ठेवण्यासाठी असलेल्या पोलीस शिपायाला पैसे देऊन पटवण्यात आले होते. दिवसभर पाणी हि न पिणारे हे रात्री मस्त पैकी चिकन बिर्याणी वर ताव मारून श्रमपरिहार करीत. एव्हढ्या रात्री खरकटे कुठे टाकायला जाणार अधिच दिवसभर च्या उपासामुळे थकलेले असायचे तेव्हा ते व्यासपीठाखाली ढकलून द्यायचे. 

हि सगळी रामकथा कळाली तेव्हा जिल्हाधिकारी म्हणाले, “उभ्या आयुष्यात इतका डोकेबाज माणूस नाही पहिला पण तुम्ही फसवणूक केलीत सरकारची.” त्यावर “सरकार तरी आमच्याशी कुठे निष्ठेने वागतंय??” असा प्रतिसवाल करीत त्यांना गप्प केले.  यावर निरुत्तर झालेल्या जिल्हाधीका~यांनी लिंबू सरबताऐवजी चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली. 
Powered by Blogger.

आम्हीं जगभर