4

मराठी संगीतविश्वातील आणखी एक तारा निखळला..

"श्रावणात घन निळा’ असो किंवा ‘निज माझ्या नंदलाला’ असो, ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ असो किंवा ‘सावळे सुंदर रुप मनोहर’ असो, आजही ही गीते चिरतरूण आहेत. य़ा व यांसारख्या कित्येक गीतांना स्वरबद्ध करणारे, मराठी संगीतविश्वातील हिरा, आपले सर्वांचे लाडके खळे काका अर्थात ज्येष्ठ संगीतकार पद्मभूषण श्रीनिवास खळे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. मराठी संगीतविश्वातील एक ताराच  जणू निखळला..


कालच बाप्पा घरी आले असताना, सर्वत्र चैतन्याचे वातावरण असताना ही बातमी खरच मनाला चटका लावून गेली. मराठी कॉर्नर परिवार व बझ्झवाडीची चावडी तर्फे खळे काकांना भावपूर्ण श्रद्धांजली..

--
-Adwait
 marathi corner team
Powered by Blogger.

आम्हीं जगभर