0

आजचा दिवस

        

                  २६ जुलै २००५, तारीख तशी सहज लक्षात राहण्या सारखी पण हा दिवस होता, निसर्गाच्या भयनाट्याचा त्याच्या उदरात भरलेल्या रागाचा, आणि तेच घडले होते २६ जुलै रोजी रोजच्या वेळेप्रमाणे धावणारी मुंबई आणि उपनगरे ते थेट ठाणे, कल्याण, कर्जत, कसारा.... पर्यंत, पण सकाळपासून रिमझिमत चालू झालेल्या पावसाने दिवस भर दमदार हजेरी लावली होती. एरव्ही मुंबईला पाठ दाखवून पाळणारा पाऊस त्यादिवशी मात्र मुंबईच्या जीवनाशी खेळ खेळत होता. काही म्हणू शकतो आपण दैवाची नाराजी किंवा निसर्गाचा कोप काहीही पण पावसाने जणू काही हातच न राखून ठेवता मनसोक्त खेळायचं हे ठरवलेले होते. पण त्याचा खालचा उन्मत्तपणा काही जास्तीचा वाढीव ठरला आणि तो मुंबईकरांच्या जीवाशी खेळून गेला. घरी निघालेले सर्व लोक अर्ध्यातच अडकून पडले. अर्ध्यादिक लोकांना तर घरी पोहोचता आलेच नाही. ते भिजणे शेवटचे भिजणे होते.
                  अनंत पसरलेला हा माणसाच्या विश्वाचा पसारा आणि कुटुंबाचा आधार असलेली त्याची ती नाती, त्यादिवशी तर खूप दूर गेली होती. चहूकडे पाण्याने भरलेले शहर आणि वास्तव्याला नसलेली जागा, कोलमडलेले जीवन, तुटत असलेला श्वास हे चित्र त्या दिवशीचे होते. सलग ३ दिवस पडणाऱ्या त्या पावसाला सोबत होती ती समुद्राची ज्याने आपल्या भयकार लाटांनी मुंबईचे बाहेरील विश्वच बंद केले. काही लोक वाहून गेली तर काहींची घरे वाहून गेली. आणि राहिले मागे ते फक्त अश्रू.
                 सर्व ठिकाणची छायाचित्रे पाहणे अतिशय कठीण झाले. पण जे पहिले गेले ते हृदयद्रावक होते. विकिपिडीयावर सुद्धा याची माहिती उपलब्ध आहे. ते नुकसान फार मोठ्ठेदेखील होते.आज मुंबई पुन्हा पूर्वपदावर असली तरी तिला जे काही भोगावे लागले ते अतिभयंकर होते.
                  आज हा लेख लिहिला, तो फ़क़्त त्या आठवणींना पुन्हा वाट करून देण्यासाठी, त्या पुरात मृत पावलेल्या त्या सर्व व्यक्तींसाठी आपली श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून, निसर्ग आपली बाजू प्रत्येक वेळी आपल्या समोर अशीच उभी करणार आणि आपल्याला दाखवणार कि तो किती शक्ती शाली आहे!

 काही वाचनीय लेखणी या विषयान्तर्गत (साभार आंतरजालावरून)
फोटोस, ब्लॉग,  स्पष्टीकरण,
8
पावसाला सुरुवात होते न होते
तोच मनात कल्पनांचे शॉवर सुरू होतात . कुणाला भर पावसात मक्याचं भाजलेलं कणीस आठवतं , कुणाला टपरीवरचा वाफाळता चहा तर कुणाला सीसीडीमधली कॉफी ! कुणाचं काय , तर कुणाचं काय ? पण , त्याआधी आपण कुणाचा विचार करत असू तर तो फक्त ' तिचा '!
...
ती हवीच ! ती ... आपल्या प्रत्येकासाठी ' ती ' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भाने घेतला जाऊ शकतो . त्यामुळे थेट पहिल्याप्रथम ' ती ' हा शब्द वापरल्या - वापरल्या ' जी ' कोणी आपल्या चाणाक्ष डोक्यात येईल ती ' ती ' नजरेसमोर ठेवत पुढचं सगळं वाचायला आमची कसलीच हरकत नाही . तर सध्या मुद्दा असा आहे , की पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे . पहिल्या पावसाचे ते टप्पोरे थेंब , ओल्या मातीचा तो टिपिकल सुगंध , मध्येच घोंगावणारा वारा आणि लवलवणाऱ्या वीजा ! हाच तो सगळा माहोल . तसं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्या पावसासोबत बदललेल्या निसर्गाच्या रंगरूपासारखंच आपलं ' एफबी ' वरचं स्टेटसही बदललेलं असणार , पण नुसतं स्टेटस बदलून आपण थांबतो का ? तर नक्कीच नाही .
पावसाळ्यात सोबत हव्या अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण ' ती ' हा शब्द वापरतो . मग ' ती ' म्हणजे छत्रीही असू शकते ! नाहीतरी आपल्याला या छत्र्यांचं महत्त्व पावसाळ्यातचं समजतं . अगदी झिरझिर पाऊस असो नाहीतर मुसाळधार , पण वारं नसताना , आपली ही छत्री आपल्याशी कायम एकनिष्ठ असते . वाऱ्याच्या साथीने ही छत्री आपल्यासोबत बेवफाई करण्याची दाट शक्यता असते . नाहीतर एरवी तिच्याइतका वफादार आपला रेनकोटही नसतो . अगदी कडक उन्हातही छत्री आपल्याशी एकनिष्ठ राहते . नाहीतर रेनकोट घालून उन्हात फिरणं म्हणजे मेहनतीशिवाय घाम गाळणं !
अशीच अजून एक ' ती ' म्हणजे चहा ! आपल्याकडे लिंग - वचन - विभक्तीच्या बाबतीत बरेचदा गोंधळ होतो . अशाच गोंधळात काहीजण चहाला स्त्रीलिंगी करतात . खान्देशात वाढलेल्या एखाद्याच्या ' का रे भो , चहा घेतली की नी ?' अशा प्रश्नामुळे ' चहा ' हा एक स्त्रीलिंगी पेय पदार्थ आहे , याविषयी कोणतीच शंका नसते . ' आला डालके अन् मलाई मारके ' असलेली चहा म्हणजे अमृततुल्य पेयच असतं . भर पावसात रस्त्याच्या कडेला थांबून थरथरत्या हातात धरलेला अशा वाफाळलेल्या चहाचा कपच आपल्याला या पेयाचं खरं महत्त्व पटवून देऊ शकतो . आपल्याकडे कोणत्याही भौगोलिक परिस्थिती - भाषा - प्रांताचे बंधन नसलेलं हे पेय पावसाळ्यात अजूनच हवंहवंसं वाटतं
आता अजून एक भन्नाट ' ती ', म्हणजे आपली बाइक ! शहरी भटक्यांच्या जमातीसाठी ती घेऊन बाहेर पडणं म्हणजे आपली लाडकी बाइक घेऊन बाहेर पडणं , असा अर्थ असतो . या प्रकरणी ' ती ' म्हणजे बाइक असते . आणि अर्थातच पावसाळ्यातही ' ती ' हवीच असते . एरवी जशी गंमत बाइकवर भटकताना घेता येत नाही , तशी सॉलिड मजा पावसाळ्यात बाइकवर फिरताना घेता येते . सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यावर ऐकायला मिळणारं वेगळं फायरिंग किंवा पावसात भिजल्यानंतर फ्री मध्ये वॉशिंग झाल्याचं समाधान . एरवी गाडीवर पाणी उडाल्याने संताप होत असला , तरी पावसाळ्यात मात्र गाडीच्या ओल्या सीटवर बसून स्लीपरी रस्त्यावरून केलेल्या राइडचा अनुभव प्रत्येकालाच भारी वाटतो . त्यातच आपल्या बाइकवरून जाताना दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडवायचा अनुभव तर अजूनच भन्नाट !
अशा बऱ्याच ' तीं ' ची यादी आपल्यासमोर सादर करता येईल . सध्या सिद्धतेपुरते या तीन ' ती ' ठीक आहेत . ही सिद्धता पटली असेल , तर आता सगळ्यांच्या मनातल्या ' ती ' विषयी थोडंसं . कारण या सगळ्यांपेक्षा त्या ' ती ' चं कौतुक तसं सगळ्यांना असतं . त्या ' ती ' शिवाय या वर सांगितलेल्या सगळ्या ' ती ' अपुऱ्याच वाटतात . अर्थातच ही ' ती ' तशी पुरुषांना हवी असते . बोले तो ' फॉर मेन्स ओन्ली '! बाइकवर बसायला ' ती ' ची सोबत , ' वाफाळलेली ' चहा घ्यायला ' ती ' च अन् एकाच छत्रीतली ' ती ' ची सोबत तर आहाहा ! भिजत असतात दोघंही तरीही आहाहा ! दुसरी कोणी ' ती ' जरी सोबत असली तरी त्या ' ती ' सोबतचाच अनुभव आपण या नव्या ' ती ' ला सांगत असतो . चेष्टा नक्कीच नाही . विचारून बघा आपल्या तशा दोस्तांना . त्यामुळे ही सिद्धता या बाबतीतही खरी आहे . हे सिद्ध होत नाही असं वाटत असेल , तर एकदा फक्त ' ती ' ला विचारा . तिच्या शंकांची उत्तरं देत बसण्यापेक्षा हे मानणं कधीही सोप्प ! हणूनच ' ती ' हवीच !
0

True stars..........

स्टेफी ग्राफ, टेनिसपटू (१४ जून)

लेकीने टेनिसपटू व्हावं, अशी स्टेफी ग्राफचे वडील पीटर ग्राफ यांची इच्छा होती. इंश्यूरन्स सेल्समन असणारे पीटर टेनिस प्रशिक्षकाची परीक्षाही देत होते. लेक त्यांची पहिली स्टुडन्ट होती. स्टेफी अवघी तीन वर्षांची होती. पीटरने घरातलं रॅकेट तिच्या हाती दिलं अन् चेंडू फटकावण्याची अॅक्श करण्यास सांगितलं. रॅकेटने चेंडू स्विंग कसा करावा, हेदेखील पीटरनं छोट्या स्टेफीला शिकवलं. घरातली ही शिकवणी साधारण वर्षभर चालली अन् वयाच्या चौथ्या वर्षापासून तीचं अकॅडमीतील टेनिस प्रशिक्षण सुरू झालं. पाचव्या वषीर् स्टेफी पहिली स्पर्धा खेळली देखील.

व्हीनस विल्यम्स, टेनिसपटू (१७ जून)

व्हीनस व सेरेना यांना मोठ्या आस्थेने त्यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांनी कॅलिफोनिर्यातील टेनिस अकॅडमीत पाठवले. पोरींनी सुरुवातीपासून खेळात गती घेतली होती. अभ्यासतही त्या पुढे असायच्या. टेनिसमध्ये करियर घडेलच; पण त्याबरोबर शालेय शिक्षणही मुलींनी पूर्ण करावं, असं वाटल्यामुळे रिचर्डने अकॅडमीतून मुलींची नावं काढली. त्याच्या या निर्णयामुळे खरेतर अकॅडमीतील प्रशिक्षक व अन्य खेळाडूंच्या पालकांना आश्चर्य वाटले. खरेतर रिचर्डच्या निर्णयामागे आणखी एक वेगळे कारण होते. दोन कृष्णवणीर्य मुली गोऱ्यांच्या मक्तेदारीला मोडून काढत प्रगती करत आहेत, ही बाब अकॅडमीतील इतर प्रशिक्षणाथीर्ंच्या पालकांना खडकत होती. व्हीनस व सेरेनाला वर्णद्वेशी टोमणेही मारले जायचे. पण, यामुळे व्हीनस अन् सेरेनाची अभ्यास आणि खेळातील प्रगती थांबली नाही. सध्याच्या घडीला महिला टेनिसमध्ये या विल्यम्स बहिणींएवढं यश क्वचितच एखाद्या महिला खेळाडूला मिळाले असेल.
3

स्वामी विवेकानंद

सप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडे नर्वस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधु आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्त्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."सर्वात प्राचीन असणार्‍या सान्याशांच्या वेदिक परंपरेच्या वतीने, जीने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ते होते स्वामी विवेकानंद  आज ४ जुलै हा त्यांचा स्मृतीदिन. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी विवेकानंद ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. आज १०० वर्षांनंतरही अवघ्या भारतीयांना त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे, म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा "युवक दिन" म्हणून साजरा केला जातो. १८९७ साली श्रीरामकृष्ण मिशन ची स्थापना करून त्यांनी समाजसेवेची डोंगराएवढी कामे केली. स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, त्यांचे विचार आणि भाषणे सांगणारी पुस्तके यांना जगभर  मागणी असते. स्वामींनी स्व:ता कर्मयोग, राजयोग, प्रेमयोग आणि भक्तीयोग अशी व्यासंगपूर्ण ग्रंथरचना केली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना  विनम्र अभिवादन !!

शब्दांकन : निवेदिता पाटील 
छायाचित्र आंतरजालावरून साभार 
Powered by Blogger.

आम्हीं जगभर