मास्टरपिस: I Too Had a Love Story

 ( पुर्वप्रकाशित: मास्टरपिस: I Too Had a Love Story)
 


लेखक: रविंदर सिंग
भाषा: इंग्रजी (मराठी अनुवादाबद्दल माहिती नाही.)
प्रकाशन: Srishti Publishers & Distributors


मध्यंतरी परिक्षेच्या नादात वाचन पुर्णपणे बंद होतं. महिना-दोन महिने वाचन नसल्यामुळे आपोआपच काहितरी वाचावस वाटू लागलं. घरची आई-आजोबांनी वाचुन संग्रहित केलेल्या पुस्तकांची अतुल्य लायब्ररी जरी असली तरी जास्तीत जास्त पुस्तकं ही एकतर अध्यात्म ज्याचा माझ्याशी दुर-दुर चा संबंध नाही :D आणि ती सोडली तर राहिलेली थोडी फार जुनी-नवी पुस्तकं. पण वयाचा परिणाम म्हणा किंवा अचानक आलेली हुक्की पण "Love Story" वाचाविशी वाटू लागली. मित्रांकडेही काही पुस्तकं होती पण ती काय रुचली नाहीत. मग सहज फ्लिपकार्टवर सर्च केलं आणि "I Too Had a Love Story" हे National Best Selling Book च्या यादित दिसलं. पुस्तक खरेदी करणार्‍यांचे रिव्ह्यु वाचले तर सर्वांनी ४/५ स्टार दिलेले. मग कोणताही विचार न करता घेतलं विकत.

२ दिवसांत पुस्तक माझ्या हातात होतं. लगेच घेतलं वाचायला. प्रस्तावना वगैरे गाळून डायरेक्ट कथेलाच हात घातला. ४ इंजिनिअरिंगचे मित्र, बर्‍याच दिवसांनी एकत्र येतात. जवळ-जवळ ४ वर्षांनी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात सेटल झालेला असतो. मग इकड-तिकडच्या गप्पा. वगैरे- वगैरे. सुरवात वाचल्यावर वाटू लागलं "च्यायला, अजुन एक " 5 point Someone" दिसतयं." थोडासा निराष झालो. पण आता घेतलयं एवढ्या हौसेने तर वाचलं तरी पाहिजेच! मग परत घेतलं वाचायला आणि तोच माझा सगळ्यात योग्य निर्णय ठरला असं म्हणायला हरकत नाही. I Too Had a Love Story या पुस्तकाला मी "एक मास्टरपिस" असं म्हणेन.

कथेचा नायक रविन म्हणजेच स्वतः लेखक रविंदर सिंग. एक पंजाबी इंजिनिअर. वेल एज्युकेटेड, वेल सेटल्ड पण अजुनही बॅचलर. मित्रांच्यात पैज लागते की कोण पहिले लग्न करणार! साधारण नायक हा लग्नाच्या विचारातही नसलेला पण मित्रांना त्याच्यावरच खात्री असते की "आमच्यात पहिले लग्न तुझेच होणार!". मग मित्रांच्यात इंटरनेट विश्वात घडणार्‍या नव्या क्रांती विषयी चर्चा होते आणि विषय निघतो "मॅट्रीमोनिअल साईट" म्हणजेच "विवाहसंस्था संकेतस्थळ" www.Shadi.com बद्दल. चौघांपैकी फक्त एकच मित्र या नव्या पद्धतिच्या बाजूने असतो तर नायकासह उरलेले तिघे त्याच्या विरोधात. पण तो मित्र या तिघांना पटवून देतो की आपण आपल्यासाठी कशी साथिदार हवी आहे हे दिलेल्या categories मधून अगदी एका click सरशी बघू शकतो वगैरे वगैरे. पण तरिही हे लोक काही त्याच बोलण ऐकून घेत नाहीत.

नंतर थोड्या दिवसांनी नायक सहज मजा म्हणून त्या संकेतस्थळावर स्वतःची प्रोफाईल बनवतो. नंबर वगैरे देतो, त्याला कशी मुलगी पाहिजे वगैरे माहिती भरतो. सगळ व्यवस्थित झाल्यावर ते संकेतस्थळ त्याला क्षणात त्याच्या अपेक्षा पुर्ण करणार्‍या मुलिंची यादी दाखवते. हा प्रकार पाहून तोही हदरतो की इतक्या झटक्यात माझी "ड्रिमगर्ल" तेही इतक्या "ऑपशन्समधे" ? मग त्यातल्या बर्‍याच जणिंशी संपर्क साधतो. काही उत्तर देतात. काहिना तो आवडतो तर त्याला त्यातली कोणिच नाही आणि एके दिवशी त्याची "परफेक्ट मॅच" त्याला भेटतेच.

त्या दोघांच्यात पहिले मैत्री आणि नंतर हळूहळू प्रेम होते. एकमेकांना प्रत्यक्षात कधिही न पाहता देखिल ते एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करू लागतात. थकवणारे दोघांचे शेड्युल असले तरी रात्र-रात्र फोनवर गप्पा मारण्यात घालवू लागतात. त्यांचा रोमांस वा़चताना खरोखरच मजा येते. माझ्या नशिबी अजुनतरी असलं काही नाही आलं (लवकर येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ;) )पण तरिही वाचताना खुप मजा आली. एक विशेष म्हणजे कोठेही "वासना" दिसली नाही आणि हिच या लेखकाबद्दलची आवडलेली गोष्ट. अगदी सरळ साधं निर्मळ प्रेम. आणि तेही इतकं की एकमेकांना न बघताही एकमेकांना साताजन्माचे जिवनसाथी मानू लागलेले.

पुस्तक खुप सुंदर सुरू होतं. ते दोघे एकमेकांसाठीच जणू बनले असतिल, कोणाची द्रुष्टच लागावी असं त्यांच प्रेम. पण काय कोणास ठाऊक त्यादिवशी मला कोणती विपरित बुद्धी झाली. अचानक बसल्या बसल्या प्रस्तावना वाचली. आणि त्यात लिहिलेलं "प्रत्येक प्रेमकहाणी ही पुर्ण होतेच असं नाही!" ..... बस्स......! माझ्या काळजाचा ठेका चुकला. हा काय प्रकार आहे? नेमकं काय झालं असेल त्यांच्या प्रेमाला? कोणाची नजर लागली असेल? नायिका नायकाशी "टाईमपास" तर करत नसेल? किंवा तिची ती प्रोफ़ाईल ज्यावर नायकाने विश्वास ठेवला ती खोटी तरी नसेल? की आणखी काही.....? सतराशेसाठ शंका मनात आल्या. एकेक पान वाचताना ह्रदयाचे ठोके जोरात धडधडू लागले. परिक्षा जवळ आल्यावर जशी भिती वाटते तशी काहिशी भिती वाटू लागली. आणि खरच सांगतो अशी प्रेमकथा कोण्या दुष्मनावरही येऊ नये. ;(

एखादी व्यक्ती जेव्हा दुसर्‍यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते, स्वतःचं आयुष्य जीच्यावर ओवाळून टाकते तिच व्यत्की जेव्हा मिळत नाही तेव्हा होणारे ते दुःख खरच अंगावर काटा आणते. माझ्यासारखा कठोर मनाचा (माझ्या आईच्या भाषेत "दगड" :)) ) असलेलाही वाचताना कित्येकवेळा डोळ्यात अश्रू काढतो यावरच या लेखकाची ही लेखणी किती प्रभावशाली असेल याचा अंदाज येतो. पुस्तकाचा शेवट नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आणेल.

मला पुस्तक इतकं आवडलं की मी नेटवर आणखी माहिती काढायचा प्रयत्न केला. तेव्हा समजलं की ही त्या लेखकाची "सत्यकथा" आहे. मी त्या नायिकेचाही शोध घेतला. मजा म्हणजे त्या नायिकेचा फेसबुकवर "फॅनपेज" आहे आणि मी ही त्याला "Like" केलय! तेवढ्यात मला या कथेचा पुढचा भाग फ्लिपकार्टवर दिसला. आता तोही मागवला आहे. लवकरच वाचून त्याचाही रिव्ह्यु ब्लॉगवर प्रसिद्ध करतो.


का वाचावे
एक निर्मळ प्रेमकथा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे "सत्यकथा". माझ्या वयाच्याच काय पण अगदी प्रौढांनाही वाचताना मजा येईल. कदाचित त्यांच्या पर्सनल Love Stories ज्या पुर्ण झाल्या - नझाल्या त्या ताज्या होतिल. ;) खरच म्हणतात ना "Life never stops" . वाचताना आपणच नायक आहोत असा काहिवेळा मला भास झाला इतकं प्रभावी लेखन! माझ्यामते हे एक "Must Read" पुस्तक आहे.

का वाचू नये

तसे काहीच कारण नाही. आणि द्यायचेच झाले तर तुम्ही "ब्रम्हचारी" असाल तरच वाचू नका असे म्हणावे लागेल! :D :))
ओव्हरऑल खरच एक छान पुस्तक आहे. "Must Read" पुस्तक.  मी या पुस्तकाला रेटिंग देईन:


-अद्वैत उमेश कुलकर्णी
मराठी कॉर्नर

4 comments:

तुझी पोस्ट पाहून climax काय असेल हीच जास्त ओढ लागली... म्हणून मग climax आधी वाचला.... पण आधी climax वाचून नंतर पहिल्यापासून वाचताना सुद्धा छान वाटतंय पुस्तक... :)
 
एक वैयक्तीक मत.

माहीत नाही पण दोन वर्षांपूर्वी अशी ४-५ पुस्तके खूप कमी वेळात वाचली आणि त्याची उबग आल्यासारखे झाले. त्यामुळे, आता साहजिकच अश्या नवीन पुस्ताकांकडे बघावस वाटत नाही. हल्ली असे खूप नवीन भारतीय तरूण लेखक होऊ घातले आहेत. बिनधास्त लेखनातून आणि मालमसाला लावून 'करमणूक' करणे हा एकच उद्देश बहुतेक लिखाणातून जाणवतो. आपल्या मातीच साहित्य अस जाणवत नाही, माझ्या नापसंतीचे बहुदा हेच कारण असावे.

असो परीक्षण प्रसिद्धी करीता तुमचे धन्यवाद. :)
 
@इंद्रधनू
:) खरच खुप सुंदर आहे पुस्तक! :)

@Arjun Deshpande
खरयं तुमचं पण हे पुस्तक नक्कीच त्या Categoryमध्ये येत नाही. मी ही दुर्जोय दत्ताची, करण बजाजची काही पुस्तक वाचलियेत, तिही छानच आहेत पण तुम्ही म्हणताय तसा "मसाला" त्यात जाणवतो.पण हे पुस्तक खरोखरच वेगळ आहे. "सत्यकथा" हा या पुस्तकाचा मुख्य plus point म्हणता येईल! मी तुम्हाला हे पुस्तक वाचायचा आग्रह करेन. एकवेळ आवश्य वाचा!
 
नक्की वाचेन ....हा लेख वाचून आता तर हे पुस्तक वाचावेसे वाटू लागले आहे.
शेवट काय हा प्रश्न पुस्तकाकडे खेचून न्हेतो आहे...:)
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर