0

मराठी असे आमुची मायबोली..




मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला, यशाची पुढें दिव्य आशा असे
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ॥१॥

जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी,
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता, थोरवी,
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं,
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ॥२॥

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ॥३॥

हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां
प्रभावी हिचे रूम चापल्य देखा पडवी फिकी ज्यापुढे अप्सरा
न घालूं जरी वाङमयातील उंची हिरे मोतियांचे हिला दागिने
‘मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ॥४॥

मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यांत ही खंगली
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्‍नें नियोजूं तयांना हिच्या मंडणीं
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ॥५॥

कवी माधव ज्युलियन..
2

सांग सांग भोलानाथ

सांग सांग भोलानाथ
यावेळी मनासारखी increment होईल का?
नाही झाली तरी वाढवून मिळेल का?
सांग सांग भोलानाथ
का यावेळी पण चेहरे
बघून increment होईल
त्यासाठी जास्त मेक अप करून येवू का?
सांग सांग भोलानाथ
यावेळी पण हातावर तुरी मिळेल का?
सांग सांग भोलानाथ
सांग सांग भोलानाथ

मूळ लेखन :- अमर रणभरे (स्पंदन........ मनाचे ---- मनाशी)
3

बझ्झवाडीची चावडी

                      



                     अखेर २६ जानेवारीचा दिवस उजाडला आणि एका अविस्मरणीय दिवसाचा शुभारंभ झाला. धावत पळत रिक्षाने बसने शेवटी एकदाचा शिवाजी पार्कला पोहोचलो. आणि दिसले ते अनोळखी पण ओळखीचे वाटणारे चेहरे. प्राथमिक ओळख परत एकदा झाली. वैशाली ( जिच्यामुळे मी बझ्झ जॉईन केले आणि आजचा दिवस माझ्यासाठी आला), अर्जुन, मंदार, प्राची आणि प्रणिता. मला चहा पिल्याशिवाय जमत नाही त्यामुळे प्रथम  पिला तो चहा. आणि वाट पाहत बसलो अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सेक्रेटरीची.
                     प्रथम आला तो मंदार आणि त्यापाठोपाठ अतुल आणि निवी. निविला पहिले आणि माझा अंदाज खरा ठरला. ती आणि मी एकाच बस मधून आलो होतो, मी तिला स्टेशन पर्यंत फोल्लोव सुद्धा केले होते पण नंतर  विचार आला चुकून गाल सुजायाचा आणि दिवस वाया जायचा. त्यामुळे वैशू ला फोन  केला आणि गाल व्यवस्थित घेवून गेलो. आम्ही वाट पाहून फेरफटका मारायला लागलो आणि सेक्रेटरीचे आगमन झाले कल्पेश (कल्पि म्हणत नाही कारण ते नाव petented  आहे आणि त्याची roayalti  आमच्याकडे नाही). तोपर्यंत अतुलची फोटोग्राफी आणि निवी ची फास्ट लोकल  चालू झाली होतीच. म्हणता म्हणता २ तास गेले आणि आगमन झाले अध्यक्ष (गणेश) आणि उपाध्यक्ष (स्नेहा). आमची काही प्रतिक्रिया येण्या अगोदरच त्यांनी केक आणि कोल्ड्रिंक्स समोर केले आणि आमचा आवाज  गायब झाला.

                          केक कापून आमच्या दिवसाला सुरुवात झाली तोपर्यंत १ वाजला होता आणि पोटात कावळे ओरडत होते. यथावकाश मंदार ने सुजाता मध्ये नेले आणि पोटभरून कावळ्यांना शांत केले. त्याच वेळी आगमन झाले ते आमची गेस्ट प्रीती. मग काय एकदा पोट भरल्यावर आठवण झाली विठोबाची आणि पावले वळलीत ती सिद्धिविनायक कडे.  तिथून थेट फेसाळलेल्या समुद्राकडे. तिथली प्रसन्न हवा मनसोक्त घेतल्यावर चालू झाले फोटोसेशन. बझ्झ मॉडेल वेग वेगळी पोझ  देत होती पण अतुल तिचे तोंडच कॅमेरात घेत होता.
              समुद्र काठावर ट्रेकिंग !!!!!! काय अतुलनीय प्रसंग होता तो. मी माझ्या मोबोईल मध्ये तो कायमचा फिट करून ठेवला.
                     शेवटी जो नको होता क्षण जवळ आला ...... निरोप !!!!!!!!! सर्वांचे चेहरे पडलेले मोबोईल नंबर एक्स्चेंज करून सर्वांची पावुले चालली परतीला. पण पावुले जड झाली होती. भेटण्याअगोदर वाटले होते अनोळखी स्वभाव अनोळखी चेहरे पण कधी वाटलेच नाही ते, आम्ही सर्व अनोळखी आहोत आणि प्रथम भेटत आहोत. आमची भेट होती अगदी लहानपनापासून  ओळखत असल्यासारखी. सोशल नेटवर्किंगचे फायदे , तोटे  ऐकले होते वाचले होते पण अनुभवत होतो एक सुंदर मैत्रीचा क्षण.


          वैशुचे मौनव्रत तर निवीची फास्ट लोकल,
          निलेशचा अबोलपणा तर अर्जुनचा शांतपणा,
          मंदारचे लाजणे तर काल्पेशाचे बागडणे,
          काळजीवाहू गणेश तर भेदरलेली प्रीती,
          मॉडेल स्नेहा तर फोटोग्राफर अतुल,
          प्राची, प्रणिता हम साथ साथ है.
पण न विसरणारी एकच गोष्ट, जी प्रत्येक वेळी आठवेल घरातून बाहेर पडताना घरात प्रवेश करताना. आणि ती म्हणजे स्नेहा चे sandal  प्रेम !!!!!!!!!!!!!!!!!!!!!

शेवटी काय  तर .....
                 मैत्री म्हणजे सुंदर पहाट
                कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
                आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
               सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न..
               फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
               कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं
               आठवडयातून ऊगवणारी रविवारची सकाळ
               हवीहवीशी वाटणारी रम्य संध्याकाळ..
               मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
              अन् जणू दरवळणारा मारवा
              अंगावर घ्यावा असा राघवशेला
             एकदा घेतला तरी बस्स असा अमृतप्याला...
             ऍकत रहावी अशी हरीची बासरी
             अस्मानीची असावी जशी एक परी...
             मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
             दु:खावरची हळुवार जादूची झप्पी

मूळ लेखन - अमर रणभरे (स्पंदन........ मनाचे .......... मनाशी)
 .
8
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
इथे कुणी न कुणा ओळखे ,
गुग्ल्या ने बनविले  घोळके ,
चला भेटूया पुन्हा  नव्याने  करू नव्या कुरघोडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
कोण कुठले कुणास ठावे ,
बझवरी दिसती केवळ नावे ,
 तरी मैत्रीच्या धाग्यामध्ये  रुते  मने केवढी ...
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
इथल्या तिथल्या चर्चा चालू ,
कुणी भले तर भलते चालू ,
गप्पांटप्पांमध्ये  कधी तर होई तोडाफोडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
कुणी शांत,  कुणी करी मस्करी  ,
इथे कुणा तर रागच भारी ,
ज्ञानाच्या सागरी उधळते इथे कुणाची होडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
आमच्या नादी लागील कोणी ,
मिळून त्याला पाजू पाणी ,
बुर्यास आम्ही बुरे वागतो नका काढू हो खोडी ,
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
 
;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;
 
 
 
3

वंदन



आंतरजालावरून साभार

याकुंदेंदु तुषार हार धवला ।
या शुभ्रः वस्त्रावृता ॥ १ ॥
या वीणा वर दंड मंडित करा ।
या श्वेत पद्मासना ॥ २ ॥
या ब्रम्हा अच्युत शंकरः प्रभूतीभिर ।
देवै सदावंदिता ॥ ३ ॥
सामांपातु सरस्वती भगवती ।
निःशेष जाड्या पहा ॥ ४ ॥
Powered by Blogger.

आम्हीं जगभर