बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
इथे कुणी न कुणा ओळखे ,
गुग्ल्या ने बनविले घोळके ,
चला भेटूया पुन्हा नव्याने करू नव्या कुरघोडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
कोण कुठले कुणास ठावे ,
बझवरी दिसती केवळ नावे ,
तरी मैत्रीच्या धाग्यामध्ये रुते मने केवढी ...
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
इथल्या तिथल्या चर्चा चालू ,
कुणी भले तर भलते चालू ,
गप्पांटप्पांमध्ये कधी तर होई तोडाफोडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
कुणी शांत, कुणी करी मस्करी ,
इथे कुणा तर रागच भारी ,
ज्ञानाच्या सागरी उधळते इथे कुणाची होडी
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
आमच्या नादी लागील कोणी ,
मिळून त्याला पाजू पाणी ,
बुर्यास आम्ही बुरे वागतो नका काढू हो खोडी ,
अरे .....
बझवाडीची चावडी, अरे बझवाडीची चावडी
;;;;;;;;;;;;;;;;;;; अतुल राणे ;;;;;;;;;;;;;;;;;;;;
8 comments:
Post a Comment