स्टेफी ग्राफ, टेनिसपटू (१४ जून)
लेकीने टेनिसपटू व्हावं, अशी स्टेफी ग्राफचे वडील पीटर ग्राफ यांची इच्छा होती. इंश्यूरन्स सेल्समन असणारे पीटर टेनिस प्रशिक्षकाची परीक्षाही देत होते. लेक त्यांची पहिली स्टुडन्ट होती. स्टेफी अवघी तीन वर्षांची होती. पीटरने घरातलं रॅकेट तिच्या हाती दिलं अन् चेंडू फटकावण्याची अॅक्श करण्यास सांगितलं. रॅकेटने चेंडू स्विंग कसा करावा, हेदेखील पीटरनं छोट्या स्टेफीला शिकवलं. घरातली ही शिकवणी साधारण वर्षभर चालली अन् वयाच्या चौथ्या वर्षापासून तीचं अकॅडमीतील टेनिस प्रशिक्षण सुरू झालं. पाचव्या वषीर् स्टेफी पहिली स्पर्धा खेळली देखील.
व्हीनस विल्यम्स, टेनिसपटू (१७ जून)
व्हीनस व सेरेना यांना मोठ्या आस्थेने त्यांचे वडील रिचर्ड विल्यम्स यांनी कॅलिफोनिर्यातील टेनिस अकॅडमीत पाठवले. पोरींनी सुरुवातीपासून खेळात गती घेतली होती. अभ्यासतही त्या पुढे असायच्या. टेनिसमध्ये करियर घडेलच; पण त्याबरोबर शालेय शिक्षणही मुलींनी पूर्ण करावं, असं वाटल्यामुळे रिचर्डने अकॅडमीतून मुलींची नावं काढली. त्याच्या या निर्णयामुळे खरेतर अकॅडमीतील प्रशिक्षक व अन्य खेळाडूंच्या पालकांना आश्चर्य वाटले. खरेतर रिचर्डच्या निर्णयामागे आणखी एक वेगळे कारण होते. दोन कृष्णवणीर्य मुली गोऱ्यांच्या मक्तेदारीला मोडून काढत प्रगती करत आहेत, ही बाब अकॅडमीतील इतर प्रशिक्षणाथीर्ंच्या पालकांना खडकत होती. व्हीनस व सेरेनाला वर्णद्वेशी टोमणेही मारले जायचे. पण, यामुळे व्हीनस अन् सेरेनाची अभ्यास आणि खेळातील प्रगती थांबली नाही. सध्याच्या घडीला महिला टेनिसमध्ये या विल्यम्स बहिणींएवढं यश क्वचितच एखाद्या महिला खेळाडूला मिळाले असेल.
0 comments:
Post a Comment