पावसाला सुरुवात होते न होते
तोच मनात कल्पनांचे शॉवर सुरू होतात . कुणाला भर पावसात मक्याचं भाजलेलं कणीस आठवतं , कुणाला टपरीवरचा वाफाळता चहा तर कुणाला सीसीडीमधली कॉफी ! कुणाचं काय , तर कुणाचं काय ? पण , त्याआधी आपण कुणाचा विचार करत असू तर तो फक्त ' तिचा '!
...
ती हवीच ! ती ... आपल्या प्रत्येकासाठी ' ती ' हा शब्द वेगवेगळ्या संदर्भाने घेतला जाऊ शकतो . त्यामुळे थेट पहिल्याप्रथम ' ती ' हा शब्द वापरल्या - वापरल्या ' जी ' कोणी आपल्या चाणाक्ष डोक्यात येईल ती ' ती ' नजरेसमोर ठेवत पुढचं सगळं वाचायला आमची कसलीच हरकत नाही . तर सध्या मुद्दा असा आहे , की पावसाळ्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे . पहिल्या पावसाचे ते टप्पोरे थेंब , ओल्या मातीचा तो टिपिकल सुगंध , मध्येच घोंगावणारा वारा आणि लवलवणाऱ्या वीजा ! हाच तो सगळा माहोल . तसं आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पहिल्या पावसासोबत बदललेल्या निसर्गाच्या रंगरूपासारखंच आपलं ' एफबी ' वरचं स्टेटसही बदललेलं असणार , पण नुसतं स्टेटस बदलून आपण थांबतो का ? तर नक्कीच नाही .
पावसाळ्यात सोबत हव्या अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण ' ती ' हा शब्द वापरतो . मग ' ती ' म्हणजे छत्रीही असू शकते ! नाहीतरी आपल्याला या छत्र्यांचं महत्त्व पावसाळ्यातचं समजतं . अगदी झिरझिर पाऊस असो नाहीतर मुसाळधार , पण वारं नसताना , आपली ही छत्री आपल्याशी कायम एकनिष्ठ असते . वाऱ्याच्या साथीने ही छत्री आपल्यासोबत बेवफाई करण्याची दाट शक्यता असते . नाहीतर एरवी तिच्याइतका वफादार आपला रेनकोटही नसतो . अगदी कडक उन्हातही छत्री आपल्याशी एकनिष्ठ राहते . नाहीतर रेनकोट घालून उन्हात फिरणं म्हणजे मेहनतीशिवाय घाम गाळणं !
अशीच अजून एक ' ती ' म्हणजे चहा ! आपल्याकडे लिंग - वचन - विभक्तीच्या बाबतीत बरेचदा गोंधळ होतो . अशाच गोंधळात काहीजण चहाला स्त्रीलिंगी करतात . खान्देशात वाढलेल्या एखाद्याच्या ' का रे भो , चहा घेतली की नी ?' अशा प्रश्नामुळे ' चहा ' हा एक स्त्रीलिंगी पेय पदार्थ आहे , याविषयी कोणतीच शंका नसते . ' आला डालके अन् मलाई मारके ' असलेली चहा म्हणजे अमृततुल्य पेयच असतं . भर पावसात रस्त्याच्या कडेला थांबून थरथरत्या हातात धरलेला अशा वाफाळलेल्या चहाचा कपच आपल्याला या पेयाचं खरं महत्त्व पटवून देऊ शकतो . आपल्याकडे कोणत्याही भौगोलिक परिस्थिती - भाषा - प्रांताचे बंधन नसलेलं हे पेय पावसाळ्यात अजूनच हवंहवंसं वाटतं
आता अजून एक भन्नाट ' ती ', म्हणजे आपली बाइक ! शहरी भटक्यांच्या जमातीसाठी ती घेऊन बाहेर पडणं म्हणजे आपली लाडकी बाइक घेऊन बाहेर पडणं , असा अर्थ असतो . या प्रकरणी ' ती ' म्हणजे बाइक असते . आणि अर्थातच पावसाळ्यातही ' ती ' हवीच असते . एरवी जशी गंमत बाइकवर भटकताना घेता येत नाही , तशी सॉलिड मजा पावसाळ्यात बाइकवर फिरताना घेता येते . सायलेन्सरमध्ये पाणी गेल्यावर ऐकायला मिळणारं वेगळं फायरिंग किंवा पावसात भिजल्यानंतर फ्री मध्ये वॉशिंग झाल्याचं समाधान . एरवी गाडीवर पाणी उडाल्याने संताप होत असला , तरी पावसाळ्यात मात्र गाडीच्या ओल्या सीटवर बसून स्लीपरी रस्त्यावरून केलेल्या राइडचा अनुभव प्रत्येकालाच भारी वाटतो . त्यातच आपल्या बाइकवरून जाताना दुसऱ्याच्या अंगावर पाणी उडवायचा अनुभव तर अजूनच भन्नाट !
अशा बऱ्याच ' तीं ' ची यादी आपल्यासमोर सादर करता येईल . सध्या सिद्धतेपुरते या तीन ' ती ' ठीक आहेत . ही सिद्धता पटली असेल , तर आता सगळ्यांच्या मनातल्या ' ती ' विषयी थोडंसं . कारण या सगळ्यांपेक्षा त्या ' ती ' चं कौतुक तसं सगळ्यांना असतं . त्या ' ती ' शिवाय या वर सांगितलेल्या सगळ्या ' ती ' अपुऱ्याच वाटतात . अर्थातच ही ' ती ' तशी पुरुषांना हवी असते . बोले तो ' फॉर मेन्स ओन्ली '! बाइकवर बसायला ' ती ' ची सोबत , ' वाफाळलेली ' चहा घ्यायला ' ती ' च अन् एकाच छत्रीतली ' ती ' ची सोबत तर आहाहा ! भिजत असतात दोघंही तरीही आहाहा ! दुसरी कोणी ' ती ' जरी सोबत असली तरी त्या ' ती ' सोबतचाच अनुभव आपण या नव्या ' ती ' ला सांगत असतो . चेष्टा नक्कीच नाही . विचारून बघा आपल्या तशा दोस्तांना . त्यामुळे ही सिद्धता या बाबतीतही खरी आहे . हे सिद्ध होत नाही असं वाटत असेल , तर एकदा फक्त ' ती ' ला विचारा . तिच्या शंकांची उत्तरं देत बसण्यापेक्षा हे मानणं कधीही सोप्प ! हणूनच ' ती ' हवीच !

8 comments:

waiting 4 u r comments guys..........
 
This comment has been removed by the author.
 
मस्त .. "ती"नामा झकास !!
 
चौर्य कर्म पाप आहे हो - ! :) http://goo.gl/LhQ0g

ढापू!! :)
 
चौर्य कर्म पाप आहे हो - ! :) http://goo.gl/LhQ0g

ढापू!! :) +1

Admin Please Delete this post......
 
चौर्य कर्म पाप आहे हो - !
 
title kay maza baba yeun denar ka post la ???
 
title kay maza baba yeun denar ka post la ??? >> Title aahe - 'Tee haweech' :)
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर