सप्टेंबर ११, १८९३ साली अमेरिकेतील शिकागो शहरात सर्वधर्मीय परिषद भरली होती.सुरुवातीस थोडे नर्वस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधु आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सात सहस्त्र जमावाने टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता."सर्वात प्राचीन असणार्या सान्याशांच्या वेदिक परंपरेच्या वतीने, जीने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ते होते स्वामी विवेकानंद आज ४ जुलै हा त्यांचा स्मृतीदिन. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेले स्वामी विवेकानंद ४ जुलै १९०२ रोजी अनंतात विलीन झाले. आज १०० वर्षांनंतरही अवघ्या भारतीयांना त्यांचे जीवन प्रेरणादायी आहे, म्हणूनच त्यांचा जन्मदिन हा "युवक दिन" म्हणून साजरा केला जातो. १८९७ साली श्रीरामकृष्ण मिशन ची स्थापना करून त्यांनी समाजसेवेची डोंगराएवढी कामे केली. स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, त्यांचे विचार आणि भाषणे सांगणारी पुस्तके यांना जगभर मागणी असते. स्वामींनी स्व:ता कर्मयोग, राजयोग, प्रेमयोग आणि भक्तीयोग अशी व्यासंगपूर्ण ग्रंथरचना केली. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !!
शब्दांकन : निवेदिता पाटील
छायाचित्र आंतरजालावरून साभार
3 comments:
Post a Comment