पाऊस आणि मुंबईकर एक अतूट नात आहे. कारण कडक उन्हाळ्यात लोकल च्या प्रवासाने घामाघूम झालेला मुंबईकर सुखावतो तो याच पावसाने. अल्हाददायक पहिल्या पावसामुळे सुटलेला मातीचा सुगंध परफ्युम पेक्षाही मनाला भावतो तो ह्याच पावसामुळे.ठिकठिकाणी जमलेलं पाणी त्यामुळे झालेली वाहतुकीची कोंडी, पावसामुळे झालेला चिखल, कपडे सांभाळत ऑफिस ला जायला होणारा उशीर म्हणून मुंबईकरांना वैताग येतो तो याच पावसाचा; पण जरा कुठे पावसाने दडी मारली कि मुंबईकर चर्चा करतो ती याच पावसाची.
२६ जुलै २००५ मुंबईकरांच्या सर्वात कटू आठवणी आहेत त्या याच पावसाबरोबर. आलेल्या प्रसंगाला तोंड देत आपलं स्पिरीट दाखवलं होतं ते याच पावसाला. शेजारच्याला घरात घेताना पण १० वेळा विचार करणारे मुंबईकर कसलाही विचार न करता मदतीला पुरात अडकलेल्यांच्या मदतीला धावून गेला तो याच पावसात. आपले पिल्ले घरी पोहोचली नसली तरी पाण्यात अडकलेल्या भुकेल्या जीवांच्या पोटात गरम- गरम जावं म्हणून २ मिनिटं वाली मॅगी का होईना पण बनवून खायला घालणाऱ्या आयांची ओळख झाली ती याच पावसात.
दादर माटुंगा या सारख्या सखल भागात पाणी साचले तरी त्याची पर्वा न करता मुंबईकर आनंद लुटतो तो याच पावसाचा. पण हाच पाऊस विकांताला पडला तर मग तो रीमिझीम बरसणारा असो वा धो-धो कोसळणारा असो बेधुंद होऊन मुंबईकरांची पाऊले वळतात ती वरळी सी फेस किंवा मग मरीन ड्राईव्ह वर. आणि अश्याच पावसाचा आस्वाद घेताना टिपलेली हि छायाचित्रे
छायाचित्रे : भरत पालव
5 comments:
प्रत्येक मुंबईकराच्या मनातल बोललीस .... :)
Post a Comment