तुझी सोबत तुझा सहवास....

तुझी सोबत तुझा सहवास....
माझं स्वप्न कि माझा भास....

तुझ्या हात माझे हात...आणि आपली बिनखर्चाची पायपीट....
माझी अखंड बडबड आणि तुझ्या कानाशी कीटकीट ...
तरीही माझ्या बोलण्याकडे..तुझं लक्ष खास...
तुझी सोबत..तुझा सहवास...

तुझ्या डोळ्यात सांर काही कळल्याचा भाव...
चेहऱ्यावर मात्र पांघरलेला...साळसूदपणाचा आव...
क्षणात माझा..क्षणात परका...अगदी अनोळखी माणसासारखा...
तरीही तुझ्या वागण्यात...आपलेपणा खास....
तुझी सोबत..तुझा सहवास...

मी तुझा Boyfriend आहे असं just suppose ....
असं म्हणून तुला मारायचंय खोट खोट propose ...
होकार मात्र खरंच हवाय तुला अगदी मनातून...
नाही म्हणाले तर गमावेन का रे..मी तुला हातातून??
हीच चिंता..हीच काळजी.. हाच झालाय त्रास....
तुझी सोबत..तुझा सहवास...

असली जरी आपल्यामध्ये ओळख आणि सख्य....
होकार देण मात्र तुला...नाही मला शक्य...
खोट खोट प्रेम करणं मला नाही जमत ...
जास्त दिवस असल्या खेळात.. मन नाही रमत...
तरीही तुझ्या आठवणीत..मी रमते तासंतास...
तुझी सोबत तुझा सहवास....
माझं स्वप्न कि माझा भास...

-(c) पियू (०५.०९.२००७)

15 comments:

wow...

would like to hear more from you...!!

nice one...

:-)
 
Piyu............. apratim............ keep it up.......... mast mast mast
 
"नाही म्हणाले तर गमावेन का रे..मी तुला हातातून??
हीच चिंता..हीच काळजी.. हाच झालाय त्रास...."

Best line :)

Super like, chaan ahe kavita, please keep writing. :)
Good Luck :)
 
खोट खोट प्रेम करणं मला नाही जमत ...
जास्त दिवस असल्या खेळात.. मन नाही रमत...

best line............wah....
 
apratim aahe!!!! superlike.....keep it up
 
हरवलेली परी सापडली आज, फ्याबुलस कविता

पियू प्रेम शिकवलस, असं लिहिण्यासती प्रेम समजल पाहिजे.
 
pahilaach praytna stutya aahe! ashich 'pari'may lihit raha ashi shubhechha
 
लिहित जा अजून.
 
आभार्स तुम्हा सगळ्यांचे.. खूप हुरूप आला तुमच्या प्रतिक्रिया वाचून.. मी नक्की लिहित राहीन आता..
 
Ki kavita vachata na ,dolya sammor chitra i mean video sammor yeta agdi mast. Bhest.

ek request

tujha kadu ayaknya majha yeli plz ekda teri mala ayikav
 
तुझ्या कवितेचा सहवास ,असाच राहू दे ...
 
Anonymous
khup chhan Ahe hi kavita .kharachhhhhhhh khup awadali mal...all the best..!!
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर