कहानी चंद्रकांता कि !!!!

आज सकाळी TV वर चॅनेल सर्फ करत असताना अचानक सहारा वन वर कार्यक्रम बघितला कहानी चंद्रकांता कि !!!! आणि मनात विचार आला आयला चंद्रकांता परत चालू झाली?? १९९४ ते १९९६ च्या दरम्यात दूरदर्शन वर चालणारी दर रविवारी लागणारी सिरीयल मी आणि माझा भाऊ न चुकता बघणारे. कालांतराने हि सिरीयल दूरदर्शन वरून बंद होऊन सोनी तव वर आली . आपण हि सहारा वन वर चालू झालेली हि नवीन चंद्रकांता डेली सोप सारखी कहानी पुढे नेलेली निघाली. आता मात्र हद्द झाली म्हणत मी आपला चॅनेल बदलला. शेवटी काहीच नाही म्हणून गाणी ऐकत बसली. पण मन मात्र मागच्या आठवणींमध्ये अडकून बसला ह्या चंद्रकांता मधला सर्वात लक्षात राहिलेलं पात्र म्हणजे अखिलेंद्र मिश्र यांनी साकारलेला "क्रूर सिंग" आणि त्याची ती "याक्कू" म्हणण्याची पद्दत. ते आठवण आली आणि अचानक कंटाळेल्या चेहऱ्यावर हसू फुटलं. त्यानंतर लगेच आठवला तो भाऊ आणि त्याच्या उद्योगामुळे त्याला आम्ही क्रूर सिंग नाव ठेवला होता. 

                                                     क्रूर सिंग त्याच्या दोन चेल्यांसह

झालं असा होता हि भावाच्या केसात झाला होता कोंडा आणि ह्या पट्ठ्याला वाचनाची फार आवड. त्याचमुळे त्याच्या वाचनात आलं होतं कि केसांना लिंब लावलं कि कोंडा कमी होतो. मग काय हि स्वारी पोहोचली आई कडे म्हणायला लागली मी केसांना लिंब लावतो. आई बिच्चारी कामात होती म्हणाली आपण नंतर लावू मी आत्ता कामात आहे. थोड्यावेळाने आईचे काम आटोपले तसे भावाने परत आठवण करून दिली केसांना लिंब लावून दे म्हणून. मी बघितलं या मायलेकांचा केसांना लिंब लावायचा कार्यक्रम चालू होतोय आपण आपला पळाव म्हणून मी वरच्या मजल्यावर गेली थोड्या वेळाने दादा म्हणेज आमचे वडील आले. त्यांचा आवाज ऐकून मी खाली आली आणि भावाला बघून जोरात हसू आला ते हसू आवारत मी विचारलं हा क्रूर सिंग का झाला?? कारण लिंब लावल्यामुळे त्याचे केस उभे राहिले होते. हे ऐकून तो आरशात बघायला गेला आणि आम्ही सगळे हसू लागलो. तेव्हापासून कितीतरी महिने त्यांना तेच नाव पडल होतं. आजही आठवलं कि हसू आवरत नाही. आता ती चंद्रकांता हि नाही आणि तशी वेळ हि येत नाही फारशी. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी असाच मनाच्या कुपीत असलेला आठवणींचा अत्तर जीवन सुखी करत असतं.

0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर