अहाहा !!!!!!!!!!!!! शेवटी काल जरा बर वाटलं. मान्सून नाही, पण मान्सूनपूर्व पावसाने, काल मात्र पावसाने सुखावलं.
सणसणत्या उन्हात, त्याच्या काहिलीने हैराण रोज ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस प्रवास किती तो जिकरीचा झालेला, पण काल मात्र पावसाने जीव माझा सुखावला.
रोज रोज विरघळणारे शरीर, त्या घामाच्या चिंब भिजवणाऱ्या धारा, नकोश्या वाटणाऱ्या स्वतःच्या वासाने नाक खूप दुखावलं, पण काल मात्र पावसाने नाक माझ सुखावलं.
सकाळचा प्रवास, दिवसभर काम आणि संध्याकाळी त्या गरमी ने हैराण होऊन मी पुन्हा घरी जाणार या चिंतेने मान माझे ग्रासलेले, पण काल मात्र पावसाने मन माझे सुखावलं.
संध्याकाळ झाली आणि अंधार पसरवू लागली. जणू काही रात्रच झाली, सोसाट्याने वारा आला. सगळीकडे शांतता पसरवून गेला. बघता बघता नभी काळे ढग व्यापले. पण काल मात्र त्या पावसाने सुखावले.
बघता बघता टपोर थेंब गाली येऊन पडला. बघता बघता टपोर थेंब गाली येऊन पडला. पुढे पाय टाकला आणि सरसरून पाऊस आला. क्षणात त्याने पूर्ण भिजवून टाकले. पण काल मात्र पावसाने सुखावले.
भिजत भिजत घरी जाताना वेगळाच आनंद लागला. उड्या मारत जावे जणू मनातला मुलगा जागवला, गाली हसून स्वतःशी मित्रांना साद घातली. पहिल्या पावसाची जाणीव त्याने जागवली.
मान्सूनचा पाहिला पाऊस म्हणून मनात घर केले, सकाळी पेपर वाचला अन स्वप्न जणू भंगले. बातमी आली हा तर मान्सूनपूर्व पाऊस, पण सुखावणाऱ्या त्या पावसाने पूर्ण झाली हौस.
मान्सून असो किंवा नसो, पहिला येवो न येवो पण पहिल्यांदाच आलेल्या त्या पावसाने आसमंत सारे गळले. पण काल मात्र त्या पावसाने मात्र सुखावले.
तरी, अहाहा !!!!!!!!!!!!! शेवटी काल जरा बर वाटलं. मान्सून नाही, पण मान्सूनपूर्व पावसाने, काल मात्र पावसाने सुखावलं.
कल्पेश
मूळ लेखन : कल्पेश मोहिते (रणांगण)
8 comments:
मान्सून पूर्व "ही" बरसात तर रेग्युलर पावसाळा सुरु झाल्यावर काय ? असा माझ्या सारख्या नवोदिताला (म्हणजे इथे) प्रश्न पडलाय...आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत ...अन त्या नक्की पूर्ण होतील असा विश्वास वाटतोय... छान लिहिलंय ! मस्त.................
Post a Comment