भ्रमंती ...................

ब्लॉग लिहिण्याचा हा माझा पहिलाच आणि छोटासा प्रयत्न ..मी आपल्या समोर सदर करत आहे, आम्ही फिरायला गेलेल्या काही स्थळांचा आणि घटनांना  माझ्या भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे, हे लिहित असतांना काही त्रुटी असल्यास ..आपण मला समजून घ्याल अशी आशा करतो ...

  


 आम्ही तिघे मित्र सचिन ,सत्यन , आणि  मी ,,,,,,,एकदा असेच फिरायला जाण्याचा बेत  केला ..पण त्या साठी काही मुहूर्तच येत नव्हता ,,,,
 एक दिवस शेवटही तो क्षण  आला आणि आम्ही निघालो महलक्ष्मि ,ज्योतिबा आणि  गणपतीपुळेला बाप्पाच्या दर्शनाला ,,,,,प्रथम आम्ही सातार्याला गेलो ,,सचिन च्या घरी .तिथे जाऊन आम्हाला फौर व्हीलर घेऊन पुढे जाण्याचा ठरलं .तशी सातार्याला जाण्याची   माझी पहिलीच वेळ ,,,आधी फक्त ऐकून होतो ,तसा सत्यन पण सातार्याचा आटपाडी हे त्याच गाव...
आम्ही तिघे वाशी ला भेटलो आणि तिथून बस मधून सातार्याला निघालो ,,तशी खूप गर्दी होती  त्या दिवशी गाड्यांना कारण सुट्टीचे दिवस होते ते 
कसे बसे आम्ही बस मध्ये चढलो , कामाच्या व्यापातून वेळ काढून खूप दिवसानंतर  जाण्याचा योग आल्या मुळे आम्ही तिघे हे खूप खुश होतो ...आणि आमचा प्रवास सुरु झाला ...गप्पा गोष्टी ,गाणे एकत आमचा प्रवास चालू होता .....आम्हाला 4 दिवसात सगळं फिरून यायचा होता तशी योजना हे केलेली ,,,मजा करत करत आम्ह्चा प्रवास चालू होता ....त्यामध्ये आमच्या साहेबांचे म्हणजे सचिन चे फोन वर फोने चालू  त्यामुळे अम्हीये वैतागलो होतो शेवटी सत्यन ने त्याचा फोन स्वीच  ऑफ  केला ,,,आणि परत आमच्या गप्पा  रंगात आल्या  ...,,,त्यावेळी आम्ही लोनावळयाच्या  घाटावर होतो ..आणि अचानक आमची बस थांबली ......काय झाले म्हणून सगळे कुजबुजू लागले ...बस चालकाशी बोलल्या नंतर कळले कि बस चे इंजिन खराब झाल्या मुले बस पुढे जाऊ शकत नाही ....बस बंद झाल्या मुले मूड ऑफ झाला होता ...  मी बसच्या खाली उतरलो ..आणि घाटा वरून   मध्य रात्री मध्ये तार्यान सारखे दिसणारे ते दिवे ...जणू आकाशातील तारेच जमिनी वर आल्या सारखे वाटत होते ...एका बाजूला उर भरून येईल असा उत्तुंग डोंगर ,,,आणि दुसर्या बाजूला मनात धडकी भरेल अशी खोल दरी ,,,,एक ते दीड तास आम्हाला तिथे थांबावे लागले ...नंतर आम्ही दुसर्या गाडी ने पुढे निघालो ,,,आणि  रात्री ३.४० ला आम्ही सातार्याला पोहोचलो ....सचिनच्या घरी आम्ही येणार हे माहित होता त्यमुळे त्यांनी आमची तशी व्यवस्था पण करून ठेवली होती ...मग आम्ही थोडा आराम करून सकाळी तेथून निघायचं ठरवलं,सकाळी आजीने गरम गरम पोहे ..चाय,,आणि सोबत नेण्य साठी पोळ्या आणि चटणी दिली ...मग आज्जी चा आशीर्वाद घेऊन आणि प्रेमाने दिलेली शिदोरी घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो ,,,घाटांचा प्रदेश सातारा ...सकाळी सकाळी सूर्य देवता जणू त्या डोंगरांना आपल्या किरणांनी अभिषेक करत आहेत  असे वाटत होते ...सचिन गाडी चालवत होता ,सत्यन नेहमी सारखा मागे झोप काढत होता ..आणि मी सातार्याच्या नयनरम्य निसर्गाचे डोळे भरून आस्वाद घेत होतो ...आणि मग माझे आणि सचिन च्या गप्पा शुरू झाल्या ....सचिन आपल्या गावाकडच्या जुन्या आठवणी सांगत होता ,,त्याच बोलन ऐकून मीही
माझ्या गावी म्हणजे औरंगाबाद ला जाऊन पोहोचलो, तसा मी मुळचा औरंगाबाचा ,,,ते मित्र .ती शाळा .ते मैदान .कौलेज     ..बघता बघता डोळ्यांच्या पापण्या ओल्या झाल्या ....
आणि मधेच सचिन चे छोड आये हम वो गलीया हे गाणे चालू झाले ....आणि मी हि त्याच्या बरोबर ताल धरला आणि त्यामुळे आमचे राजे (सत्यन  ) हे झोपेतून उठले आणि त्यांच्या प्रेमळ शब्दात आम्हाला आपल्या प्रतिक्रिया दिल्या (सां रे ग मां पा सारखे ) आणि आम्ही हसत हसत ...कोल्हापूर ला पोहोचलो कोल्हापूर ....आई महल्क्ष्मि जिथे वास करते ते ठिकाण ,,,छत्रपती श्री शाहू महराजांचे ते शहर ....प्रथम आमचे पाउल  आई महलक्ष्मिच्या दर्शना साठी वळले ,,,ते भव्य आणि अप्रतिम कोरीव काम केलेले हेमाद्पथिंय मंदिर  आणि तो मंदिराचा प्रसन्न परिसर ...नेहमी प्रमाणे खूप गर्दी होतीच तरीआईच्या  दर्शनाचा ध्यास असल्यामुळे गर्दीचे काही वाटले नाही पुढे सरकत सरकत आम्ही मंदिराच्या गाभार्यात गेलो ... आणि साक्षात आई चे ते सुंदर रूप आमच्या नजरेस पडले ,आणि आम्ही धन्य झालो . दर्शन घेऊन बाहेर आल्या नंतर ,खूप प्रसन्न वाटत होते  , कोल्हापूरच्या अस्सल मराठी जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही ...ज्योतिबाच्या डोंगराकडे निघालो ...पंच  गंगेचेच्या पुलावरून जाताना घाटाचे दर्शन घेतले .पण मनाला थोडस वाईट वाटल  नदीची अवस्था बघून ,नद्यांना आपल्या देशात पवित्र स्थान आहे ..परंतु आपण आपल्या स्वार्थ साठी पर्यावरणाचा र्हास करत आहोत , पुढे आम्ही कोल्हापूरच्या वायव्येस १४.४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरावरून सर्वांना आशीर्वाद देणाऱ्या , आराध्यदैवत ज्योतीबांच्या दर्शनाला निघालो,ज्योतिबाचे डोंगर निसर्गाची एक अतुल्य भेट आहे असे मला ते डोंगर पाहून अनुभूती आली.३१२४ फुट उंच असलेला डोंगर, नागमोडी वळणावरून आमची गाडी हळू हळू डोंगर चढत होती ,या डोंगराला वाडी रत्नागिरी सुद्धा म्हणतात.शेवटी ज्योतीबाच्या मंदिराच्या कळसाचे दर्शन झाले,अतिभव्य असे ज्योतिबाचे ते मंदिर आणि तो परिसर एक वेगळीच अनुभूती देत होता ज्योतीबांच्या नावाने उधलेल्या गुलाला ने जणू मंदिराने गुलाबी शाल पांघरल्या सारखे वाटत होते ...ज्योतिबाच्या नावाने चंग भलं म्हणत आम्ही दख्खनच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी   मंदिरात प्रवेश केला ज्योतीबांचे ते रुबाबदार आणि प्रेमळ रूप मनाला  शांती आणि समाधान देणारे होते ,ज्योतिबा डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत. ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग, केदारेश्वर व रामलिंगाची आहेत.दर्शन घेऊन आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला निघालो  ..म्हणजे गणपतीपुळेसाठी ,रत्नागिरीचा आंबा घाट आम्ही पार करत होतो लालमाती ,रस्त्याच्या दुतर्फा असलेले आंब्याचे झाड ...डोंगर दरी मध्ये वसलेले छोटे  छोटे गाव मन मोहित करत होते आंब्याच्या बागा,काजूच्या बागा..उंच आणि नागमोडी तो आंबा घाट.सर्वांना आपलेसे करणारे कोकणचे हे  निसर्ग सौंदर्या बघून मला काही ओळी  आठवल्या..
                                                " पहिली वेळ पहिली आठवण

                                                  अनमोल नात्याची सुरेख साठवण
                                                   गार गार वारा  अन मैत्रीचा सुवास
                                                   त्यात कोकणाचा निसर्ग ,
                                                   हि तर पर्वणीच खास "

 
      आंबा घाटाची दरी  बघून मनात धस्स झाल्या सारखा झालं..परंतु निसर्गाच्या सोन्दर्याने नटलेल्या रत्नागिरीचा तो परिसर सगळे विसरण्यास भाग पाडत होता ...असे करत आम्ही रात्री गणपती पुळे ला जाऊन पोहोचलो , रात्रीचे ९.३० वाजले होते त्यामुळे मंदिर बंद झाले होते ..त्यामुळे आम्ही रात्री मुक्काम करायचं ठरवल ...सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे लॉज आणि हॉटेल सर्वे फुल होते ..खूप प्रयत्न करून एक रूम भेटला ...सततच्या प्रवासामुळे  थकवा आणि खूप भूक सुद्धा लागली होती ..एका  हॉटेल मध्ये आम्ही जेवण केल ..रत्नागिरीत यायची पहिलीच वेळ त्यामुळे खूप उत्सुकता आणि उत्साह होता ..समोरचा समुद्र पाहून त्याच्या किनार्यावर वाळूत बसण्याचा मोह आम्ही आवरू शकलो नाही ..आणि मध्य रात्री पर्यंत आम्ही तिथे बसून गप्पा मारत होतो ...साधरणताः रात्री ०२ वाजता आम्ही झोपायला रूम वर आलो  , सकाळी सकाळी आम्ही ६.०० वाजता उठून तयार झालो रूम मधल्या खिडकीतून बाहेर पाहताक्षणी अथांग पसरलेल्या समुद्राचे आणि आपल्या प्रकाशाने अखंड श्रुष्टी ला प्रकाशित करणार्या सुर्यानारायाचे दर्शन झाले .. ४०० वर्षापूर्वीचे स्वयंभू असे ते गणपती देवस्थान मंदिराला लागूनच असलेले अरबी समुद्र ,  सकाळच्या वेळी मंदिराचा तो नयनरम्य परिसर ..मंदिराच्या घंटीच्या आवाज मुळे आणि मंत्रोचारामुळे  वातावरणात एक वेगळेच पावित्र्य निर्माण झाले होते ...बाप्पांचे आवडते मोदक आणि जास्वन्द्च्या फुलांचा हार घेऊन आम्ही बाप्पाच्या दरबारात पोहोचलो ,बाप्पाची स्वयंभू मूर्तीचे दर्शन घडताच मनाला खूप शांती लाभली  ,बाप्पाचा अभिषेक सोहळा पाहून डोळ्याचे  पारणे फेडल्या सारखे झाले ...काही वेळ मंदिरात बसून देवाचे नामस्मरण करून आम्ही बाहेर आलो ....समोर च्या अरबी समुद्राचे ते मोहक रूप पाहण्या साठी ,अत्यंत स्वच्छ .आणि सुंदर तो समुद्र किनारा , देवस्थान ,आणि पर्यटनस्थळ म्हणून सुध्दा  गणपती पुले हे चांगले ठिकाण आहे ...रत्नागिरी पासून ४० कि  मी वर असलेल्या गणपतीपुळे   या निसर्गाचे वरदान लाभलेले आणि  बाप्पाचे वास्तव असलेल्या या पवित्र ठिकाणी एकदा तरी प्रत्येकाने या ठिकाणी यावे असे मला  वाटते ...बाप्पाचे दर्शन घेऊन ,आणि परत एकदा इथे यायचे ठरवून , सुंदर आठवणींची शिदोरी घेऊन आम्ही ..परत मुंबईचा रस्ता धरला आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.

3 comments:

वाह.. छान झालेली दिसतेय ट्रीप... छान लिहिलंस...
 
वाह वाह पहिलाच प्रयत्न छान रंगला रे खूप सुंदर वर्णन
 
चांगला प्रयत्न आहे!
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर