आजपर्यंत शतकानु शतके आईच्या कितीतरी गोष्टी, कविता, गाणी, चित्रपट एकले वाचले. पण बाबांविषयी कमीच बोलले गेले. पिता म्हणजे जन्मदाता, त्यांच्या असण्याने आपण पूर्ण आहोत. आपली आई, कुटुंब, घर अर्थातच अधुरे आहेत. आईचे उपकार न विसरण्यारखे पण बाबांचे उपकार न टाळण्यासारखे आहेत हो न! कित्ती थोरवी वाचावी तेव्हढी कमीच आहे त्यांची, आज आपण कित्तेक वर्षाने दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून भरलेल्या डोळ्यांनी ते दिवस आठवतो, आपल्या आपल्या वडिलांना आठविण्याचे कारण पण वेगळे वेगळेच कि कधी त्यांनी केलेल्या उपकारांनी तर कधी दिलेल्या नकारात्मक निर्णयाने ते विस्मरणात आहेतच. आई रसाळ आंब्याचे रूप तर वडील काटेरी फणसाच्या आतल्या गोड गरयासारखे, बाहेरून काटेरी स्वभाव पण आतून तिळ-तिळाने तुटणारे त्यांचे प्रेमळ मन आठवावे तितकेच कमी, आज आपण बरीच प्रगती केली आहे. अहो बाबांचा अरे बाबा सुद्धा झालाय. आपली वडीलांसाठी असलेली आदरणीय हाक आज जरी बदलली असली तरी त्यांच्या विषयीचा आदर मात्र नाही बदललाय. आईला आपली प्रेमाची हाक "अग आई!" म्हणून असते, मग बाबांना "अहो बाबा" बोलून दूर का करायचं? आदर देण्यासाठी संबोधन एकेरी नसावे असे काही नाही आणि मला तर ते पटले. असो ते आपल्या आपल्यावर अवलंबून आहे. पिता-मुलांचे नातेच काही और असते.
वडील कित्ती महत्वाचे हे काय बोलण्याचा विषय नाही. पण ते नसते तर आपण दुनिया बघितली नसती त्यांचे अस्तित्वच आपले विश्व देवाने प्रत्येक घरात जाता येत नाही म्हणून त्याने प्रत्येकाला आई दिली पण त्याला प्रत्येकाचे चोचले नाही पुरविता येत म्हणून त्याने प्रत्येकाला वडील दिले असं मला वाटत. त्या मात्या - पित्याचे उपकार थोरच आहेत आणि एक दिवस पाळून काय साध्य होणार. प्रत्येक दिवस त्यांच्या नावावर असायला पाहिजे. लहानपणा पासून मोठ्ठ होईपर्यंत त्याचं योगदान खूप महत्वाच असते. आपल्या लहानग्याला मोठ्ठ केल पाहिजे, शिकवलं पाहिजे, सर्व दुखांपासून लांब आणि जगातील सर्व सुख मिळाली पाहिजेत म्हणून ते कित्ती तरी काटकसर करतात. शेवटी त्याचंपण आयुष्य आहेच कि पण तरीही ते इतकी मोठ्ठी काटकसर करतात आणि आपल्या पिल्लांना वाढवतात. अभ्यास नाही केलं म्हणून रागविणे, मारणे, ओरडणे या गोष्टी नसत्या तर आपल्याला वळण कसं लागल असत. आपले पाकिटाचे पोट भरणे, वेळीस मोठ्ठ्या मोठ्ठ्या त्रासातून बाहेर काढणे हे वडीलच करतात कि, आई जीवनाचा आधार असतो पण बाप जीवन जगण्याचा निर्धार असतो. कारण पुराणात आणि वेदात, श्लोकांत वाचेलच आहे आपण माता-पित्यांची थोरवी.... त्यांच्या शिवाय जसे आयुष्य पूर्ण नाही होत. थोड खरचटलं कि पटकन बोलतो "आई ग!" पण मोठ्या अपघातातून वाचलो कि तोंडातून निघत "बाप रे !".
दररोज च्या जेवांची सोय करणारी आई असली तरी आयुष्याच्या शिदोरीची व्यवस्था करणारा बापच असतो. बाबा प्रत्येकाकडे असतात. त्याच्यातला मित्र मात्र कमवावा लागतो. मग त्यांच्यातला मित्र मिळवण्यासाठी प्रयत्न करणार नं!!
Happy Fathers Day!!!
शब्दांकन: कल्पेश मोहिते (रणांगण)
3 comments:
हे खरय ....आपण वडिलाशिवाय आपण काहीच बोलत नाही...
Post a Comment