ऐकावे जनाचे करावे मनाचेएकदा २ बेडूक दुधाच्या भांड्यात पडले खूप प्रयत्न करून सुद्धा दोघांना बाहेर पडता येत नव्हते ,वरून काही बेडूक त्यांना असे करा, तसे करा म्हणून सल्ले देत होते, खूप प्रयत्न करूनही त्यांना बाहेर पडता येत नाही म्हणून त्यांच्या सहकार्यांनी त्यांचे आता काही होणार नाही आता फक्त देवच तुम्हाला वाचवू शकतो म्हणून देवाचे स्मरण करा असे सांगितले. त्यामधला एक बेडूक तो सतत हात पाय मारत होता, तर दुसरा प्रयत्न करणे सोडून देवाचे नामस्मरण करू लागला हा बेडूक अजूनही प्रयत्न करत होता सतत त्या दुधावर हात पाय मारत होता ...सतत हात पाय मारल्याने त्याच्या अंगाची घाण त्या दुधात पडली आणि ते दुध फाटले, त्यामुळे दुधाचा जड भाग खाली राहिला आणि पाणी वर आले . दुसरा बेडूक मात्र प्रयत्न न केल्यामुळे मरून पाण्यावर तरंगत होता ,या बेडकाचे प्रयत्न चालू होते दिवस भर तो हात पाय मारून प्रयत्न करत होता. त्यामुळे पाणी अजून वर आले आणि तो बेडूक बाहेर पडला बाहेर आल्या नंतर त्याच्या सहकारी बेडकांनी त्याला विचारले आम्ही जे सांगत होतो ,ते तू का ऐकलेस नाहीस ..नंतर कळाले तो बेडूक बहिरा होता ....सांगायचं उद्देश हाच कि कोणी किती जरी सांगितले तरी आपल्या मनाला जे पटेल तेच करावे ...म्हणजेच ...

ऐकावे जनाचे करावे मनाचे

2 comments:

गोष्टीप्रमाणे वागणे आवडेल मला उगीच दुसर्याकडे का बघून जगायचे दुसर्याने माझ्यासारखे जगावे............. मस्त मस्त मस्त
 

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर