शीर्षक वाचून चरित्र लेख असल्यागत वाटल हो ना........ मला वाटलेलंच पण काय आहे मला शीर्षक सुचलंच नाही. तर आता सांगतो लिहिण्याच कारण काय ते, परवा मी माझ्या एका मित्र सोबत असाच फिरत होतो. तेव्हा गप्पा मारता मारता त्याने विचारले कि, "भगवान गौतम बुद्ध हे माणूस होते. असा मी आज वाचल!" मी थोडा चकित झालो आणि त्याला विचारले कि, "हा प्रश्न का?" तर त्याने उत्साहाने सांगितले कि, "हा प्रश्न मी सकाळी एकाकडून एकल, आणि त्याच उत्तर तूच देऊ शकतो आता मला तू सांगच." माझ्या मनात आले "कि हा आज वेताळ झाला आहे कि काय आणि मी स्वतःला विक्रम समजू लागलो" मस्करी नको म्हणून मी त्याला हसत उत्तर दिल कि "हो, भगवान बुद्ध हे माणूसच होते, परमेश्वराने साक्षात मानवाला दर्शन कधीच दिलेले नाही आणि देणारही नाही. पण त्याने जशी आई बनवली तसेच त्याने माणुसकी दर्शविण्यासाठी काही थोर पुरुषांना जन्म दिला".
थोडासा वेळ गेला आम्ही फिरून झालं. आणि मघाचा प्रश्न पुन्हा त्याने विचारला मग मी त्याला संपूर्ण माहिती सांगितली. भगवान बुद्ध म्हणजे राजा सिद्धार्थ याने आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. तर पुन्हा "का? म्हणून" प्रश्न केला. आता काय कराव खरोखर मी राजा विक्रम झालो होतो. "हम्म, मग समजावून सांगितलं ते एक मानवच होते. बुद्ध आर्य वंशज होते त्यांची आई राणी मायादेवी व वडील राजा शुद्धोधन हे होते.त्याचं खर नाव राजा सिद्धार्थ होत. पण लहानपणापासून राजघराण्यात राहिलेल्या सिद्धार्थला दुख: या गोष्टी पासून अलिप्त ठेवण्यात आले होते. पण वयात आल्यावर सिद्धार्थ स्वतः त्या गोष्टींच्या समोर जाऊ लागला होता. २९-३० वयापर्यंत त्यांनी दुख:, दारिद्र्य, दैन्य पाहिले पण नंतर त्यांनी याचे मूळ कारण काय? आपण इतके लोभी, क्रोधी, अहंकारी का होतो? मनुष्य अश्या पद्धतीने का जगतो? असे कित्तेक प्रश्न त्यांच्या मनात घर करू लागले होते. त्यात त्यांनी पाहिले कि सगळ्यांचा जन्म आहे, सगळ्यांनाच म्हातारपण, आजारपण आहे आणि सगळ्यांनाच विधिलिखित मृत्यू आहे. पण हे का आहे. हे कसं आहे. हे शोधण्यासाठी त्यांनी आपल्या राज्याच्या, पत्नी व मुलाचा त्याग केला. आणि रानात निघून गेले.त्यांनी तिथे खूप तप केले. जप केले पण त्यांच्या हाती या गोष्टींच मूळ काही लागेना आणि त्यांना विचार पडे कि कसे शोधावे त्याचे मूळ. त्यांनी कठोर तपस्या केली आणि त्यात ते मृत्युच्या जवळ जाऊन आले. पण अजूनही समाधान नव्हते. नंतर त्यांनी तपस्या सोडून अष्टांग मार्ग वापरले. ते आपण ओळखतो सम्यक दृष्टि, सम्यक संकल्प, सम्यक वचन, सम्यक कर्मान्त, सम्यक आजीव, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृति, सम्यक समाधि. या नावांनी आणि आपण यांचा रोजच आपण उपयोग सुद्धा करतोच ना." मग माझ्या मित्राला ते समजल. कि ते मानव होते. पण त्यांनी या गोष्टींचा छडा लावण्यासाठी त्याग केला होता. त्याला पटले कि त्यांचा त्याग खरंच आजच्या माणसापेक्षा मोठा होता आणि खरा होता.
असच राहून राहून पुन्हा मीच त्याला विचारले कि "काय रे तुला बुद्ध म्हणजे काय हे माहिती आहे का?" त्याने म्हटले कि "नाही". माझ्या मते जे काही आहे ते मी त्याला सांगितलं "बुद्ध म्हणजे बुद्धीच्या जोरावर ज्ञान मिळविलेला आहे तो, ज्ञान येणे अत्यंत महत्वाचे पण ज्ञान मिळविणे हे सुद्धा तितकेच महत्वाचे, देव आपल्याला बुद्धी देतो पण तिचा उपयोग आणि त्याची उद्दिष्ट पार पडणे हे आपल्या हातात असते. म्हणून जो बुद्धीवर विजय मिळवतो तो बुद्ध. आणि सिद्धार्थाने ते मिळविले म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा स्वार्थ भावाने उपयोग न करता इतर जनतेसाठी उपयोग केला. त्या ज्ञानातून प्रत्येक व्यक्तीने खूप बोध घेऊन दुखा:ने भरलेले आपले जीवनविश्व कसे मार्गी लावावे हे शिकून घेतले. शिक्षण असले तरी त्याच्या परे काही शिकण्यास मिळाले तर आयुष्य सोप्पे होते. बुद्धांनी त्यांच्या वैवाहिक, व्यावहारिक आणि सामाजिक बांधिलकीच्या जीवनाला सोडून जीवनातील अष्ट दुखांच्या विरोधात उभे राहून आपल्या जीवनात आनंद कसं आणता येईल आणि जीवन अजून सुखकर कसे करता येयील हे त्यात दाखवून दिले. आपण मनुष्य आहोत मनुष्य मनात काही ठरवून ती गोष्ट पार पडू शकतो. जीवन व्यतीत करणे म्हणजे फ़क़्त जगणे नाही याचा अर्थ बुद्धांनी दिला, आणि हे सर्व सिद्धार्थांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर मिळविले होते म्हणूनच त्यांना बुद्ध म्हंटले जाते". बुद्धांची इतकी माहिती दिली तरीही माझ्या मित्राच मन काय भरलं नव्हत. आणि डोक्यावरून प्रश्न चिन्ह काही उतरत नव्हतं पुन्हा विचारले त्याने कि मग त्यांना भगवान का म्हणतात? आता माझ्यातला विक्रम खूप पेंगला होता इतक सांगून पुन्हा आणखीन काहीतरी नवीन. परत त्याने विचारले कि "भगवान तर देवाला बोलतात न मग बुद्ध हे देव नव्हते तर त्यांना का भगवान बोलतात." मी सांगितले कि, "लहान मुलांसारखे प्रश्न विचारू नको, आता भगवान देवालाच म्हणतात असं कोण बोललं देवाला आपण काय म्हणून ओळखतो. देव आपल्याला सदैव देणारा, देणारा कधी पण मोठ्ठा असतो म्हणून त्याला भगवान म्हणतात. बुद्धांनी त्यांच्या ज्ञानाचा अपव्यय नाही केला. आणि नाही स्वार्थभावाने स्वत: करिता राखून ठवले. तर सर्व जगात आपले अनुयायी पाठवून प्रसार केला आणि त्या माध्यमातून लोकांना सरळ मार्ग दाखवला. त्यांच्या अष्टांग मार्गाचा अवलंब करणारा व्यक्ती त्यांना ज्ञान रुपी देव मानू लागला. म्हणून त्यांना भगवान गौतम बुद्ध म्हणून संबोधले जाते."
त्यांचं कार्य महान आहे माझी माहिती तर त्यांच्या कार्यासमोर खूप लहान आहे. मला जितक माहिती आणि माझ त्यांच्याविषयी जितक स्पष्ट मत आहे. त्याप्रमाणे सांगण्याचा हा तुला प्रयत्न बाकी सर्व सिक्लोच आहे शाळेत त्याच्या विचारांच्या अनुरूप जगण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो. बाकी त्यांच्या नावाने चाललेले वाद विवाद वैगेरे आपल्याला नाही ठावूक. आणि कुणाच्या धर्माला दुखावणे हा हेतू तर अजिबात नाही. भगवान बुद्धांच्या तीनही प्रतिमांना माझे त्रिवार अभिनंदन. माझे इथे काही चुकले असेल तर कृपया क्षमा असावी. त्यांच्याच प्रमाणे भगवान महावीर, भगवान महाबली यांचा सुद्धा खूप मोठ्ठा हातभार आहे. मानवी संस्कृती उभी करण्यामागे. दे सुद्धा मानवच होते. पण सर्व त्याग करून त्यांनी सुद्धा भगवान बुद्धांप्रमाणे जगाला शांती आणि सुखाचा मार्ग दाखवला.

मूळ लेखन : कल्पेश मोहिते ( रणांगण)
5 comments:
असा बुद्ध एका दमात समजावणे सोप्पे नाही ना रे .. पण तुझे प्रयत्न सोलीड ना रे... keep it up डीकरा!
Post a Comment