कुठूनतरी कानावर पडलेला हा किस्सा आठवला की लगेच चेहर्यावर हास्य उमटते. गजरा या सदरातील हे पहिले पुष्प आहे सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते श्री. शरद तळवलकरांचे. शरदरावांच्या तरूणपणी, ते संघर्ष करणारे कलाकार असतानाचा हा किस्सा. त्यावेळेस त्यांनी त्यांच्या मित्रांसमवेत खूप उडाणटप्पूपणा केला.
एकदा शरद तळवलकर आणि त्यांचा जिगरी मित्र आपाआपल्या सायकलवरून तळवलकरांच्या घरी चालले होते. दोघेही जण सायकली अगदी शेजारी शेजारी खेटून शिवाय एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून 'ये दोस्ती' च्या थाटात भर टिळक रस्त्यावरून सायकल पळवत होते. एवढं कमी म्हणून की काय सायकल चालवता चालवता ते दोघे सिगारेटही पीत होते. त्याचवेळेस रस्त्यावरून एक तिरडी घाटाच्या दिशेने मार्गक्रमण करीत होती. शरदराव आणि त्यांचा मित्र दोघांनी; तिरडी अगदी जवळ आलेली असतानाही तश्याच सर्कशी पद्धतीने सायकल चालवणे सुरुच ठेवले.
शेवटी व्हायचं तेच झालं अन यात्रेजवळून जाताना गर्दीमुळे शरदरावांचा तोल गेला आणि दोघांच्याही सायकली पडल्या. ते दोघे पडले ते पडले; पण स्वत: पडता पडता तिरडीला खांदा देणार्या एका माणसालाही धडकले. साहजिकच त्या माणसाचाही तोल गेला आणि त्यानीही तिरडीवरून खांदा सोडला अन तिरडीवरचं प्रेतही रस्त्यावर पडलं.
साहजिकच लोक संतापले आणि दोघांना मारायला धावून आले. त्याबरोबर शरद तळवलकर प्रेताकडे बोट करून म्हणाले, "अहो, जो माणूस खाली पडला, तो तर काहीच बोलत नाहीये, मग तुम्ही का एवढे रागावताय?" शरद तळवलकरांचा चेहराच इतका मिश्कील आणि बोलका होता की, मला खात्री आहे, हे वाक्य ऐकून प्रेतयात्रेतील लोकंही पोट धरून हसायला लागली असतील. :-D
इतक्या कठीण समयीसुद्धा जागी असलेल्या अश्या विनोदबुद्धीचा अचंबा मानावा तेवढा थोडाच. :)
- पंत
13 comments:
पण शेवटी विनोदबुद्धी लाजवाब. :)
यावर बोल लाविन तिथे गुदगुल्या मधला दादांचा एक डायलॊग आठवला.सीन असा असतो की काही गुंड बॆंक लुटून पैसे बॆगेत भरत असतात. तेव्हा दादा म्हणतात. "आवो येवढे पैसे घेवून जाण्यापेक्षा याच बॆंकेत आज एक खातं उघडून त्यात टाका ना?" :)
हा हा हा
Post a Comment