पहिला मराठी उद्योजक

लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर यांचा जन्म २० जून १८६९ रोजी गुर्लहोसूर या गावी झाला.धारवाड आणि कलादगी येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ र्आट मधून चित्रकलेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी काम केले. १८९७ मध्ये मुंबई सोडून ते बेळगावला आले. इ.स. १८८८ साली त्यांनी बेळगावात सायकलदुरुस्तीचे दुकान थाटत व्यावसायिक क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले. १९१० साली औंध संस्थानाकडून उत्पादनासाठी सवलती मिळाल्यामुळे कुंडल येथे निर्जन आणि निर्जल अशा माळरानावर किर्लोस्कर ब्रदर्स या नावाने लक्ष्मणरावांनी कारखाना उभारला आणि किर्लोस्कर वाडीच्या वसाहती प्रारंभ केला. शेतीसाठी लागणारे लोखंडी नांगर, मोटार, रहाट, चरक इत्यादी वस्तूंचे उत्पादन त्या कारखान्यात सुरु झाले. १९२० सालापासून भांडवल वाढविण्यासाठी कारखान्याचे त्यांनी मर्यादित कंपनीत रुपांतर केले. या कंपनीतर्फे आणखी विविध प्रकारचे उत्पादन होऊ लागले. त्यात हातपंप, लहान मोठे यांत्रिक पंप, लेथ मशीन्स तसेच लोखंडी फर्निचर इत्यादी. लक्ष्मणराव हे काही वर्षे औंध संस्थानाचे दिवाण होते. लक्ष्मणरावांनी औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण घेतलेले नसतांनाही किर्लोस्कर उद्योग समूह त्यांन अतिशय परीश्रमाने उभा केला. अशा किर्लोस्करांवर २० जुन १९८९  साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट हि काढले.


किर्लोस्करांवर २० जुन १९८९  साली भारत सरकार ने पोस्टाचे तिकीट 
हे तिकीट प्रसिद्ध करताना देलेली माहिती खाली देत आहे. 
The Kirloskar story began in 1888 when Laxmanrao Kirloskar set up a small bicycle repair shop at Belgaum. Laxanrao and his brothers set up a model industrial colony called 'Kirloskravadi'. Their new company 'Kirloskar Brothers Limited' was the parent of all the 26 companies that flourish under the Kirloskar banner today. The end of World War II brought a tremendous upsurge of industrial activity under Laxmanrao's eldest son 'S.L.'. Kirloskar Electric Company Limited at Bangalore, and Kirloskar Oil Engines Limited at Pune were established in 1946, the latter was in collaboration with U.K based Associated British Oil Engines Export Ltd., the first instance of an Indo-Foreign collaboration. Next came Kirloskar Pneumatic Company Limited (1958) and Kirloskar Cummins Limited (1962) both at Pune. The latter won a citation from Lloyd's Register of Shipping. Later the Kirloskar diversified into industrial consultancy and five star hotels among other activities. Today the Group's annual sales exceed Rs. 700 crores. It has been a long march from a small shed to 26 powerful units, from a work force of four to over 20,000 employees- the Kirloskars have kept pace with India's march to freedom, to self-sufficiency, to export around the globe, and contributing to the country's core industries such as defence, power generation, oil and gas, agriculture, steel, coal and mining, railways and transportation. The Kirloskars describe themselves as 'businessmen engaged in winning freedom and prosperity for our country through our chosen method - engineering excellence'.
किर्लोस्करांच्या जन्मदिनी त्यांना शतश: नमन 


शब्दांकन - निवेदिता पाटील 

बरीचशी माहिती आणि छायचित्र आंतरजालावरून साभार 0 comments:

Post a Comment

Powered by Blogger.

आम्हीं जगभर